ETV Bharat / state

नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीचे मडके फोडो आंदोलन

नागपूर शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मडके फोडो आंदोलन करण्यात आले.

आंदोलनावेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:33 PM IST

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोटलडोह धरणासह इतरही धरणांच्या पाण्याची पातळी मृतसाठ्यापर्यंत गेल्याने नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याविरोधात राष्ट्रवादीने मडके फोडो आंदोलन करण्यात आले.

नागपूर महापालिकेत राष्ट्रवादीचे मडके फोडो आंदोलन

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार प्रकाश गजभिये आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. शहरावर ओढवलेल्या पाणी संकटासाठी महापालिकेतील सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी केला आहे. आज शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या आसपास असताना महापालिकेचे सत्ताधारी त्यादृष्टीने विचार करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मडके फोडो आंदोलनानंतर आंदोलकांनी थेट महापौरांचे कार्यालय गाठून त्यांना पाणीसंकटाबाबत जाब विचारला.

Intro:नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोटलडोह धारणासह इतरही धरणांच्या पाण्याची पातळी मृतसाठ्या पर्यंत नंतर नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीने शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे महापालिकेचे या निर्णयाविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात मटका फोड आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महापौरांना पाणीसंकट यासंबंधी जाब विचारला

Body:नागपूर सह विदर्भात अद्यापही पावसाला सुरवात झालेली नाही ,ज्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडी पडलेली आहेत.....धरणांचे जळस्थर मृत साठ्या पर्यन्त जाऊन पोहोचल्याने इतिहासात पहिल्यांदा नागपूर शहरात पाणी कपातीचा निर्णय महानगरपालिकेला घ्यावा लागला आहे....
नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोटलडोह धारणासह इतरही धरणांच्या पाण्याची पातळी मृतसाठ्या पर्यंत नंतर नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय समितीने शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे....या निर्णया विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलने करायला देखील सुरवात केली आहे...आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे आमदार प्रकाश गजभिये आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात महापालिका समोर मटका फोड आंदोलन करण्यात आले.....शहरावर ओढवलेल्या पाणी संकटाकरिता महापालिकेतील सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी केला आहे....आज शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात असताना महापालिकेचे सत्ताधारी त्या दृष्टीने विचार करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे ... मटका फोड आंदोलना नंतर आंदोलकांनी थेट महापौरांचे कार्यालय गाठून त्यांना पाणीसंकटा संबंधी जाब विचारला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.