नागपूर - राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या आरक्षित पदांची सोडत मंगळवारी झाली. ही सोडत मुंबईत करण्यात आली. यामध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) करिता राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 35 जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी आरक्षण सोडतीची घोषणा झाली.
हेही वाचा - ...तर भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, संजय राऊतांचा इशारा
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आरक्षित जागांची संख्या ठरलेली आहे. आरक्षित पदांचे वाटप जिल्हा परिषदांना केले जाते. त्यानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी राखीव तसेच सर्वसाधारणसह राखीव प्रवर्गातील पदे महिलांसाठी राखीव ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोडती नुसार नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) करिता राखीव झाले आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २२ जानेवारीला