ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक, मंत्री सुनील केदार यांनी बजावला मतदानाचा हक्क - नागपूर जिल्हा बातमी

नागपूर जिल्हा परिषदेच्या 58  आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठी 7 जानेवारीला मतदान होत आहे.

Nagpur Zilla Parishad election
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक
author img

By

Published : Jan 7, 2020, 8:10 AM IST

Updated : Jan 7, 2020, 11:38 AM IST

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध इतर पक्षांमध्ये होत आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने भाजप जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी अधिक जोर लावताना दिसत आहे.

Live Updates -

  • 11.36 AM - कॅबीनेट मंत्री सुनील केदार यांनी बजावला मतदानाचा हक्क

हेही वाचा - 'शरद पवारांनी विचारपूर्वक माझ्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली'

नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 आणि पंचायत समितीच्या 116 जागांसाठी 7 जानेवारीला जिल्ह्य़ात मतदान होत आहे. जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना वेगळी लढत आहे. तर भाजपही 'एकला चलो'च्या भूमिकेत स्वतंत्र लढत आहे.

  • 2012 मधील पक्षीय बलाबल
  1. भाजप - 21
  2. काँग्रेस - 19
  3. शिवसेना - 8
  4. राष्ट्रवादी काँग्रेस - 7
  5. बीएसपी -3

नागपूर जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या. तर फक्त 1 जागा काँग्रेसकडे होती. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी 5 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. तर नागपूर जिल्हा परिषदमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसने कंबर कसली आहे. मात्र, मतदारराजा नेमका कोणाला कौल देतो, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

हेही वाचा - नागपूर जिल्हा परिषद निवडणूक अनिल देशमुखसह देवेंद्र फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची, उद्या मतदान

Intro:नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाली आहे...या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध इतर पक्ष असे चित्र आहे...भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे
Body:भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात जिल्हा परिषदेची निवडणूक होत असल्याने भाजपचा कस लागणार हे निश्चित आहे...
नागपूर जिल्हापरिषद ची निवडणूक अडीच वर्ष उशिराने होत आहे , भाजप ची सत्ता या जिल्हा परिषद मध्ये होती मात्र आता राज्यातील सत्तांतरामुळे जिल्हा परिषद साठी काँग्रेस राष्ट्रवादी ने चांगलीच मोर्चे बांधणी करत सोबत निवडणूक लढत आहे ...तर महाविकास आघाडीतील महत्वाचा भाग असलेली शिवसेना वेगळी लढत आहे ... नागपूर जिल्ह्यात काही भागात राष्ट्रवादी च वर्चस्व आहे तिथे राष्ट्रवादी तर जिथे काँग्रेस च वर्चस्व आहे तिथे काँग्रेस असा फार्मुला काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने ठरविला आहे ... शिवसेना ची ताकत काही भागात असली तरी सर्वत्र नाही पण त्यांनी आपली तयारी केली ... भाजप मात्र एकला चालो ची भूमिका घेत मैदानात उतरली आहे ..... भाजप ने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ४ जागा गमावल्या आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली तयारी केली असली तरी नागपूर जिल्हा परिषदेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे...५८ सदश संख्या असलेल्या नागपूर जिल्हापरिषद चे २०१२ मधील बलाबल बघितलं तर
भाजप - 21
काँग्रेस - 19
शिवसेना - 8
राष्ट्रवादी काँग्रेस - 7
बीएसपी -3

नागपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये विधानसभेत भाजपला १२ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती , मात्र २०१९ मध्ये चित्र पालटला आणि काँग्रेस , राष्ट्रवादी मिळून पाच जागा त्यांनी मिळवल्या अर्ध्यावर भाजप चा जनादेश आला त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यां मध्ये जोश .आहे . नागपूर जिल्हा परिषद हि जेवढी भाजपला आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी महत्वाची आह, तेवढीच काँग्रेस, राष्ट्रवादीला सुद्धा ती मिळवायची आहे मात्र मतदार राजा आता नेमका कोणाला हा कौल देतो हे निवडणुकी नंतरच पुढे येईल .... सध्या मतदानाला सुरवात झाली आहे,कडाक्याची थंडी असल्याने मतदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे,मात्र दिवस जसा-जसा चढत तशी तशी तशी मतदानाची टक्केवारी वाढणार आहे

Conclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.