नागपूर : इंग्रजांची राजवट असताना १९३८मध्ये महात्मा गांधींना डॉक्टर ऑफ लॉ ही मानद उपाधी देण्याचे काम याच विद्यापीठाने त्यावेळी केले. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सगळ्या डिग्री आणि उपाध्या काढून घेतल्या. त्यावेळी मोठ्या हिमतीने त्यांना डिलीट देण्याचे काम नागपूर विद्यापीठाने केले होते. सावरकरांना डिलीट दिली जात होती, त्यावेळी त्यांनी अंगावर गाऊन तर चढवला पण ती टोपी घालायला नकार दिला. त्यांनी स्पष्टच सांगितले होते की परक्यांचं ओझं हे मी खांद्यावर तर घेऊ शकतो. मात्र, डोक्यावर घेऊ शकत नाही आणि त्यावेळी ते टोपी न घालता त्यांनी डिलीट पदवी स्वीकारली होती. ज्यावेळी वंदे मातरम् म्हटले म्हणून उस्मानिया विद्यापीठाने ५०० विद्यार्थ्यांना काढले, तेव्हा देशातील कोणतेही विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागा द्यायला तयार नव्हते, त्यावेळी त्यांच्याकरिता नागपूर विद्यापीठ उभे राहिले आणि या ५०० विद्यार्थ्यांना याच विद्यापीठाने जागा दिली, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
या भारतात बंधुभाव नित्य वसु दे : राष्ट्रभक्तीचा मोठा संस्कार नागपूर विद्यापीठाला लाभलेला आहे. "या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरची असा दे" हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गीत या विद्यापीठाला कुलगुरूंनी विद्यापीठ गीत म्हणून मान्यता दिली. आज मला असे वाटते की, आपल्या सर्वांकरिता हे गीत एक अत्यंत महत्त्वाचे गीत झाले आहे. याच्यातला जो भाव आहे तोच भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
उपराष्ट्रपती नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी : उपराष्ट्रपती हिदायतुल्ला, पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, सरसंघचालक बाळासाहेब देवरस, पाच राज्यपालांनी नागपूर विद्यापीठातून डिग्री घेतली होती. चार मुख्यमंत्री या विद्यापीठाने दिले आहेत. माझ्याह, त्यातील मी शेवटचा असे नाही. माझ्यानंतरही होतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. खरंतर यादी संपतच नाही. ज्यांनी या देशाचे नाव उंच केले असे अनेक विद्यार्थी या विद्यापीठाने घडवले आहेत आणि आता शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ समोर नवीन आव्हाने देखील आहेत, याची जाणीव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
हेही वाचा: