नागपूर : राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस अपघात वाढत चालले आहे. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी राजेश भेंडारकर आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. रामटेक गडमंदिर येथे दर्शन करून ते आपल्या गावी परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची कार धडकली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल : अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच आरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. या अपघातात एकूण सातजण हे जखमी झालेले आहेत. त्यात तीन लहान मुलेदेखील आहेत. अपघात इतका भीषण होता की, समोरच्या सीटवर बसलेला चालक आणि महिला जखमी अवस्थेत कारमध्ये अडकून पडली होती.
निष्काळजीपणे ट्रक केला रस्त्यात उभा : ट्रक चालकाने निष्काळजीपणाने ट्रक भर रस्त्यात उभी केल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ट्रक लावल्यानंतर इंडिकेटरही बंद होते. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला सर्व जखमींना रामटेक शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी काही जण गंभीर होते, त्यामुळे सर्वांना नागपूरला हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनास्थळी वाहनांची गर्दी झाली होती. अपघाताप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज- वेगाने वाहने चालविणे, मद्यप्राशन करून वाहने चालविणे, पहाटे डुलकी लागणे ही अपघाताची सर्वसाधारण कारणे असल्याचे आजवर आढळून आलेले आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून जागृती करण्यात येते. मात्र, तरीही अनेकदा वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते. अपघातांमधील मृत्यूंचे वाढते प्रमाण पाहता वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
- Mumbai Eastern Express Highway accident: ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकने दिली चार वाहनांना धडक; अपघातात एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी
- Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती
- Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार