ETV Bharat / state

आईचे काळीज हिरावले; ऋषिकेशचा निकाल पाहून जागृत झाल्या त्याच्या आठवणी...

ऋषिकेश त्याचे आई-वडील व दोन बहिणी असे छोटे कुटुंब आनंदाने राहत होते. त्यातील सर्वात लहान ऋषिकेश हा बहिणीच्या अगदी जवळचा, त्यामुळे बहिण-भावातील प्रेम नेहमीच दिसून यायचे. ऋषिकेश मेहनती व हुशार मुलगा होता. ३ मे रोजी घरातील कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा झटका लागून  ऋषिकेशचा मृत्यू झाला होता.

author img

By

Published : May 29, 2019, 10:30 PM IST

आईचे काळीज हिरावले; ऋषिकेशचा निकाल पाहून जागृत झाल्या त्याच्या आठवणी...

नागपूर - ऋषिकेश हा केवळ एकाच खेळात पारंगत नाही तर दोन खेळांमध्ये तरबेज होता. बुद्धिबळ व तायक्वांडो या खेळामध्ये त्याने प्राविण्य मिळवले होते. अभ्यासातही तो हुशार होता. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी असणारी जेईई-मेन परीक्षा पास करून त्याची अॅडव्हान्ससाठी निवड झाली होती. नुकताच महाराष्ट्र मंडळाचा बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यातही तो त्याच्या इतर मित्रांच्या पुढे होता. एरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे हे त्याचे स्वप्न. मोठ्या पगाराची नोकरी मिळवून आई-वडिलांची सेवा करायची हे सुध्दा त्याचे स्वप्न होते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने ऋषिकेश झेपावला होता. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. 3 मे रोजी असे काही अघटीत घडले की, ज्यामुळे होत्याचे नव्हते झाले आणि ऋषिकेशच्या घरातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.

नागपूरच्या महाल परिसरातील बडकस चौक या भागात आमले हे कुटुंब राहते. ऋषिकेश त्याचे आई-वडील व दोन बहिणी असे छोटे कुटुंब आनंदाने राहत होते. त्यातील सर्वात लहान ऋषिकेश हा बहिणीच्या अगदी जवळचा, त्यामुळे बहिण-भावातील प्रेम नेहमीच दिसून यायचे. ऋषिकेश मेहनती व हुशार मुलगा होता. ३ मे रोजी घरातील कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा झटका लागून ऋषिकेशचा मृत्यू झाला होता.

आईचे काळीज हिरावले-

ऋषिकेश अकाली मृत्यूने आमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऋषिकेश हा सेन्ट पॉल महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. परिसरात आणि वर्गातही ऋषिकेश सर्वांना मदत करत असे. सर्व गोष्टीमध्ये ऋषिकेश अव्वल होता. बुद्धिबळ व तायक्वांडोच्या खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त केले होते. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्यातही त्याला ७३% गुण प्राप्त झाले. आपल्या दोन्ही बहिंणींप्रमाणे त्यालाही इंजिनिअर व्हायचे होते. इतकच नाहीतर त्याला समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळादेखील बांधायची होती. हे त्याचे स्वप्न सांगताना त्याच्या बहिणीचे डोळे पाणावले. आईचा 'जिगर का तुकडा हिरावला', त्यामुळे तिचाही कंठ दाटून आला. वडील त्याच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या की, ढसाढसा रडायला लागतात.

ऋषिकेश निघून गेल्याने आमले कुटुंबावर एक प्रकार दुःखाच्या सागरात बुडालेला आहे. बारावीचा निकाल लागला आणि ऋषिकेशचा निकाल पहावत ऋषिकेशच्या आठवणी परिवाराच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

Intro:ऋषिकेश हा केवळ एकच खेळात पारंगत नाही तर दोन खेळांमध्ये तरबेज होता.बुद्धिबळ व तायक्वांडो या खेळामध्ये त्याने प्रावीण्य मिळवले होते.अभ्यासातही तो हुशार होता.इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी असणारी जेईई मेन पास करून तो ऍडव्हान्ससाठी निवड झाली होती. नुकताच महाराष्ट्र मंडळाच्या बारावीचा निकाल घोषित करण्यात आला.त्यातही तो त्याच्या इतर मित्रांपैकी पुढे होता.एरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचंय हे त्याचं स्वप्न. मोठ्या पगाराची नोकरी मिळवून आईवडिलांची सेवा करण्याचं हे त्याचं स्वप्न.स्वप्नपूर्तीच्या दिशेने ऋषिकेश झेपावला होता पण नियतीला काही वेगळेच मान्य होते, 3 मे रोजी असं काही अघटीत घडलं की ज्यामुळे ऋषिकेश होत्याचे नव्हतं झालं आणि ऋषिकेशच्या घरातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.

Body:नागपूरच्या महाल या परिसरातील बडकस चौक या परिसरात आमले हे कुटुंब राहत. ऋषिकेश त्याचे आई-वडील व दोन बहिणी असं छोटे कुटुंब आनंदाने राहत. त्यातील सर्वात लहान ऋषिकेश हा बहिणीच्या अगदी जवळचा, त्यामुळे बहिण-भावातील प्रेम नेहमीच दिसून यायचा ऋषिकेश मेहनती व हुशार मुलगा होता. ३ मे रोजी घरातील कुलर मध्ये पाणी भरत असताना विजेचा झटका लागून त्यात ऋषिकेशचा घात झाला. ऋषिकेश या अकाली निधनाने आमले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऋषिकेश हा सेंट पॉल या महाविद्यालयाचा वर्ग बारावी विज्ञान चा विद्यार्थी होता. परिसरात तसेच वर्गातही ऋषिकेश सर्वांना मदत करीत असे. सर्व गोष्टीमध्ये ऋषिकेश अव्वल होता. बुद्धिबळ व तायक्वांडो चा खेळांमध्ये त्याने पारंगत प्राप्त केले होते.नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्यातही त्याला ७३% गुण प्राप्त झाले.आपल्या दोन्ही बहिणी प्रमाणे त्यालाही इंजिनिअर व्हायचं होतं. इतक्यातच नाहीतर त्याला समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळादेखील बांधायची होती हे त्याचे स्वप्न सांगताना त्याच्या बहिणीचे डोळे पाणावले. आईच्या जिगर चा तुकडा हिरावला, त्यामुळे तिचाही कंठ दाटून आला.वडील सतत त्याच्या आठवणी डोळ्यात समोर आल्या की ढसाढसा रडायला लागतात.

Conclusion:ऋषिकेश निघून गेल्याने आमले कुटुंबावर एक प्रकार दुःखाच्या सागरात बुडालेला आहे बारावीचा निकाल लागला आणि ऋषिकेशचा निकाल पहावत ऋषिकेशच्या आठवणी परिवाराच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.