ETV Bharat / state

Minor Burn Cigarette : आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून चार वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके, नराधमाकडून मुलांचा छळ - पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली

Minor Burn Cigarette : महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या नराधम संकेत उत्तरवारने महिलेच्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा छळ केल्याचा आरोप पीडित मुलाच्या आजीनं केला. आरोपीनं चिमुकल्या मुलाच्या अंगावर सिगारेटचे चटके दिले. त्यामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती चिमुकल्याच्या आईला असूनही तिनं नराधम संकेतला विरोध केला नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या आजीनं केला आहे.

Nagpur Crime
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 11:05 AM IST

Updated : Sep 12, 2023, 3:30 PM IST

नागपूर : Minor Burn Cigarette : महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणानं तिच्या मुलाला सिगारेटचे चटके देऊन छळ केल्यानं नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधमना या भागात उघडकीस आली आहे. पीडित मुलाचं वय अवघं चार वर्षे इतकं आहे. याबाबत पीडित मुलाच्या आजीला ही बाब समजल्यानंतर त्यांनी आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्यानं हा प्रकार उघडकीस आला आहे. संकेत उत्तरवार असं छळ करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

मुलाच्या शरीरावर सिगारेटचे चटके देऊन केलं जखमी : गेल्याच आठवड्यात नागपुरात 10 वर्षीय चिमुकलीवर दाम्पत्यानं नातेवाईकांच्या मदतीनं अनन्वित अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला होता. त्यानंतर आता वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधमना या भागात चार वर्षीय मुलाच्या शरीरावर सिगारेटचे चटके देऊन त्यास जखमी केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. पीडित चिमुकल्याच्या आईसोबत नराधम संकेत हा गेल्या अनेक दिवसापासून लिव्ह इनमध्ये राहत आहे. त्यानेच चिमुकल्या चार वर्षाच्या मुलाला सिगरेटचे चटके देऊन छळ केल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • चिमुकल्याच्या आईला होती अत्याचाराची माहिती : लिव्ह इन पार्टनर आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करत असल्याची माहिती त्याच्या आईला होती, असा आरोप पीडित मुलाच्या आजीनं केला आहे. माहिती असूनही त्याच्या आईनं नराधम संकेत उत्तरवार मज्जाव केला नसल्याचाही आरोप पीडित मुलाच्या आजीनं यावेळी केला आहे.

महिलेच्या नवऱ्याने केली आत्महत्या : महिलेच्या पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ती महिला दोन्ही लहान मुलांना सोबत घेऊन माहेरच्या शेजारीचं खोली करून राहत होती. दरम्यान संकेत उत्तरवार हा देखील महिलेच्या सोबतचं राहत असल्यानं दोन्ही मुलं त्याला पप्पा असं म्हणायचे. मात्र, आरोपी संकेत चार वर्षीय चिमुकल्याच्या शरीरावर सिगारेटचे चटके देऊन त्याच्यावर अनन्वित अत्याचार करत असल्याचं आजीच्या आरोपानंतर उजेडात आलं.

आजीला समजली बाब : मुलानं आत्महत्या केल्यानंतर सून वेगळी राहत असली, तरी आजीला नातवंडांचा लळा कायम होता. ती अधूनमधून नातवंडांची चौकशी करत होती. या दरम्यान त्यांना सुनेसोबत राहत असलेला नराधम नातवाला शारीरिक इजा पोहोचवत असल्याचं कळलं. ही बाब समजल्यानंतर त्यांनी लगेच सुनेचं घर गाठलं. त्यावेळी नातवानं सर्व प्रकार आजीला सांगितला. आजीनं तात्काळ वाडी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यावरून वाडी पोलिसांनी संकेत उत्तरवार विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चिमुकली छळ प्रकरणात दोन आरोपी अटकेत : 15 दिवसांपूर्वी 10 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करत अमानवी छळ केल्याची घटना पुढे आली होती. बंगळुरू येथून घरकामासाठी आणलेल्या चिमुकलीला घरातचं कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेल्याची घटना समोर आली होती. ही चिमुकली खिडकीतून मदतीची याचना करत असल्याचा प्रकार उजेडात आला होता. काही स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं तिची सुटका केली होती. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा-पिपळा रोडवरील 'अथर्व नगरी' या उच्चभ्रू वस्तीत ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी तहा अरमान इशतीयाक अहमद खानला 1 सप्टेंबरला नागपूरच्या विमानतळावरून अटक केली. तर त्याचा मेहुणा अजहर नारद्दीन शेख याला देखील अटक करण्यात आली आहे. आरोपीची पत्नी हिनाला ताब्यात घेण्यासाठी नागपूर पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान आरोपीला व्हीआयपी वागणूक दिल्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पोलीस उपनिरीक्षक राठोडला निलंबित केलं आहे.

हेही वाचा :

  1. BJP Women Leader Murder Case : तो मृतदेह 'त्या' महिला नेत्याचा नाहीच! डीएनए चाचणीत धक्कादायक खुलासा
  2. Little Girl Locked In House : चिमुकलीला घरात कोंडून ठेवणाऱ्या दाम्पत्यापैकी एकाला नागपूर विमानतळावरून अटक

Last Updated : Sep 12, 2023, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.