ETV Bharat / state

मिचॉन्ग चक्रीवादळाचा थेट परिणाम विदर्भावर जाणवणार; वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याचा अंदाज - प्रादेशिक हवामान विभाग

Michaung Cyclone : मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम विदर्भात 5 आणि 6 डिसेंबर रोजी जाणवणार आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना अन् विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक वेध शाळेकडून वर्तवण्यात आलाय. प्रामुख्यानं पूर्व विदर्भासह मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असल्यानं किमान तापमानातही वाढ होणार आहे. तसंच पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Michaung Cyclone will directly affect Vidarbha
मिचॉन्ग चक्रीवादळाचा थेट परिणाम विदर्भावर जाणवणार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 2:01 PM IST

मोहनलाल साहू- संचालक, प्रादेशिक हवामान विभाग

नागपूर Michaung Cyclone : मिचॉन्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतातील शहरांना बसलाय. मिचॉन्ग या चक्रीवादळाच्या प्रभावामुळं चेन्नई आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसामुळं शहरातील हे वादळ आज (5 डिसेंबर) आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि गोंदिया भागात होणार आहे. तसंच या ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज प्रादेशिक वेध शाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी व्यक्त केलाय.

कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत : मिचॉन्ग चक्रीवादळामुळं विदर्भात पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार झालंय. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं उभी पराटी (कापूस) शेतात भिजला होता. कापसाचा वेचना सुरू होण्यापूर्वीचं कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यात आता पुन्हा पावसाचा धोका निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय.

अधिवेशनावर पावसाचे सावट : 7 डिसेंबरपासून नागपूरमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. मात्र,अधिवेशनच्या पहिल्या आठवड्यावर आता पावसाचं सावट निर्माण झालंय. प्रादेशिक हवामान खात्याच्या माहितीनुसार 6, 7,आणि 8 तारखेला नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बंगाल उपसागरात चक्रीवादळाचा पट्टा तयार होत असल्यानं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चेन्नईत मुसळधार पाऊस : सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत चक्रीवादळ ताशी आठ किमी वेगानं उत्तर-पश्चिम दिशेला सरकलं. ते चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीच्या क्षेत्रावर केंद्रित झालं. यामुळं सोमवारी दिवसभर चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून, वीज आणि इंटरनेट सेवा खंडित झाली होती. मुसळधार पावसामुळं शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरही प्रभाव पडला होता.

हेही वाचा -

  1. अवकाळीचं ढग कायम; पुढील दोन दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
  2. महाराष्ट्रात विदर्भासह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज
  3. Update On Cyclone Tej : 'तेज' चक्रीवादळ आज दुपारनंतर आणखी तीव्र होणार; भारतावर काय होणार परिणाम?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.