ETV Bharat / state

Maharashtra Assembly Winter Session : अधिवशेनाचा आजचा दिवस वादळी ठरणार? जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक - राहुल नार्वेकर जयंत पाटील निलंबन

आज हिवाळी अधिवेशनाचा ( Maharashtra Assembly Winter Session ) पाचवा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांच्या प्रति अशोभनीय शब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील ( Jayant Patil suspension ) यांना अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत  निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमक होणार ( opposition parties more aggressive ) असल्याची शक्यता आहे.

opposition parties more aggressive after  Jayant Patil suspension
जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्ष अधिक आक्रमक
author img

By

Published : Dec 23, 2022, 7:56 AM IST

नागपूर : पुरवणी मागण्यांवरील ( winter session 2022 ) चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी द्यावी या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे सभागृहात अध्यक्ष यांना विनंती करीत होते. याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांना भास्करराव यांना बोलण्याची संधी देण्याबाबत विनंती करीत होते. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नव्हता. या संदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरला.

जयंत पाटलांनी मागितली माफी - जयंत पाटील यांच्याकडून तोंडून अपशब्द निघाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा शब्द पकडून जयंत पाटील यांचा सभागृहात निषेध केला तसेच त्यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी केली त्यामुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाल्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तर खूप करण्यात आले. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाची माफी मागितली मात्र मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ माफी मागून चालणार नाही अशा पद्धतीने अध्यक्षांचा अपमान होणार असेल तर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा ही प्रथा सुरू होईल त्यामुळे निलंबनाची मागणी करावी अशी विनंती केली.

उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणार शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे ( Mp Rahul Shewale SIT Case ) यांच्या विरोधात एसआयटी चौकशीचे आदेश सभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speakers Instruction SIT Against Rahul Shewale ) यांनी दिले. सरकारकडून ठोस भूमिका स्पष्ट न झाल्याने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण ​देताना,​​ उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणार असल्याची ग्वाही​ दिली. ​​

विधान परिषदेतही कामकाज दोन वेळा स्थगित एनआयटी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सत्ताधारी बॅकफूट मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एनआयटी भूखंड गैरव्यवहार ( Eknath Shinde Land Scam Case ) प्रकरणी बॅकफूट गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरण ( Disha Salian death case ) उचलून धरले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले होते. तर, विधान परिषदेत राहुल शेवाळे ( Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale ) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी ​​रान उठवले होते. विधान परिषदेतही कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले.

आज महाराष्ट्र राज्य किसान सभेची पदयात्रा : वर्ध्यात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या ( March of Maharashtra State Kisan Sabha ) वतीने वणी ते नागपूर पदयात्रा करत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता संघर्ष दिंडी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वर्धा जिल्ह्यातील बरबट्टी येथून निघत ही पदयात्रा नागपूर विधानभवनावर जाणार आहे. या पदयात्रेत अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

आज राज ठाकरेंचा नागपूर दौरा : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर (Raj Thackeray Nagpur visit) आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक असे त्यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका पार पडणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.