ETV Bharat / state

विदर्भात भाजपच्या वर्चस्वाला धक्का, युतीला ३१ तर आघाडीला २२ जागा - महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट

विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. जवळपास १६० जागा महायुतीला तर १०० च्या आसपास जागा या आघाडीला मिळाल्या आहेत. या निकालावरुन आघाडीने कुठेतरी कमबॅक केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर विदर्भात आघाडीने भाजपच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.

विदर्भात कोण मारणार बाजी?
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:57 AM IST

Updated : Oct 24, 2019, 9:01 PM IST

मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. जवळपास १६० जागा महायुतीला तर १०० च्या आसपास जागा या आघाडीला मिळाल्या आहेत. या निकालावरुन आघाडीने कुठेतरी कमबॅक केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर विदर्भात आघाडीने भाजपच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. आघाडीने विदर्भात २२ जागा मिळवल्या आहेत.

विदर्भात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या

भाजप - २७

शिवसेना - ४

काँग्रेस - १६

राष्ट्रवादी काँग्रेस - ६

इतर - ९

गेल्या महिन्याभरापासून चालू असलेला १४ व्या विधानसभेचा रणसंग्राम आज अखेर संपला आहे. भाजप शिवसेनेला लोकांनी जरी कौल दिला असला तरी आघाडीनेही मुंसडी मारली आहे. भाजप शिवसेनेच्या काही विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. विदर्भामध्ये साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले हे विजयी झाले. त्यांनी भाजपचे विद्यमान मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला. विदर्भात युतीला ३० जागा मिळाल्या आहेत. तर आघाडीला २४ जागा मिळाल्या आहेत.

युती पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन प्रशासकीय विभाग आहेत. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. त्यामुळे विदर्भाला प्रशासकीयदृष्ट्या देखील महत्त्व आहे. सत्ता स्थापनेसाठी महत्वाचा विभाग म्हणून विदर्भाकडे पाहिले जाते. जो पक्ष विदर्भात बाजी मारेल त्याचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.

  • रामटेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर आशिष जयस्वाल यांचा विजय, भाजपच्या मल्लिकाअर्जुन रेड्डी यांचा पराभव
  • उत्तर नागपूर : काँग्रेसचे नितीन राऊत विजयी, भाजपच्या मिलिंद मानेंचा पराभव
  • तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजीव कारे मोरे विजयी, अपक्ष चरण वाघमारेंचा पराभव
  • चंद्रपुरातील राजूरा मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष धोटे २ हजार ७० मतांनी विजयी, भाजपचे संजय धोटे यांचा पराभव
  • आरमोरी मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे विजयी, काँग्रेसचे आनंदराव गेडामांचा पराभव
  • 4.00 - गोंदियातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून विद्यमान मंत्री राजकुमार बडोलेंचा पराभव, राष्ट्रवादीच्या मनोहक चंद्रिकापुरे यांनी केला पराभव
  • 3.58 - हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्या समीर कुणावार यांचा विजय, राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेचा पराभव
  • 3.57- आर्वी विधासभा मतदारसंघातून भाजपचे दादाराव केचे विजयी, काँग्रेसच्या अमर काळेंचा
  • 3.55 - वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघातून काँग्रसचे रणजित कांबळे विजयी, अपक्ष उमेदवार राजेश बकाणे यांचा पराभव
  • 3.52 - पश्चिम नागपूर काँग्रेसचे विकास ठाकरे ६ हजार ४०० मतांनी विजयी, सुधाकर देशमुखांचा पराभव
  • 3.51 - काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख विजयी, तर भाजपचे चरणसिंग ठाकूरांचा पराभव
  • 3.50 - चिमूर मतदारसंघातून भाजपचे बंटी भांगडीया यांचा विजय, काँग्रेसचे सतिश वारजूरकर यांचा पराभव
  • 3.45 - ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी, संदीप गड्डमरवारांचा पराभव
  • 3.40 - गडचिरोलीतून राष्ट्रवादीचे धर्मराव अत्राम विजयी; १५ हजार ४५८ मतांनी विजयी; अंबरिश अत्राम यांचा पराभव
  • 3.30 - अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
  • 3.20 - आमगाव मतदारसंघातून काँग्रेसचे सहसराम कारोटे आघाडीवर
  • 3.15 - गोंदियातून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल विजयी
  • 3.00 - गोंदियातील तिरोडा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले विजयी
  • 2.00 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३२ हजार मतांनी आघाडीवर
  • 1.30 - साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर तर परिणय फुके पिछाडीवर
  • 1.15 - गोंदिया विधानसभेतून अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल,भाजपचे गोपालदास अग्रवाल पिछाडीवर
  • 1.00 - ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार १५ हजार ८०७ मतांनी पुढे, संदिप गड्डमवार पिछाडीवर
  • 12.55 - चिमूर मतदारसंघ भाजपचे बंडी भांगडीया आघाडीवर
  • 12.50- गडचिरोली मतदारसंघाचे उमेदवार भाजपचे देवराव होळी ८ हजार ७०० मतांनी आघाडीवर
  • 12.45 - बल्लारपूरम मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार २७ हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसते विश्वास झाडे पिछाडीवर
  • 12.30- रामटेकमधून अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल १८ हजार ७२६ मतांनी आघाडीवर आहेत.
  • 12.25 - बल्लापूरमधून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर
  • 12.20- ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर
  • 12.00 - अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू विजयी
  • 11.15 - अपक्ष उमेदवरा विनोद अग्रवाल आघाडीवर, विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल पिछाडीवर
  • 11.10- भंडारा अपक्ष उमेदवार नरेंद्र मोहंदकर आघाडीवर
  • 11.00 - साकोली भाजपचे परिणय फुके आघाडीवर काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर
  • 10.25 - नागपूर-पश्चिम काँग्रेसचे विकास ठाकरे १७४ मतांनी आघाडीवर
  • 10.15 - उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे नितीन राऊत ६ हजार ६११ मतांनी आघाडीवर
  • 10.05 - भंडारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष नरेंद्र भोंडेकर आघाडीवर, तर भाजपचे अरविंद भालदरे, काँग्रेसचे जयदीप कवाडे पिछाडीवर
  • 10.00 - सोकोलीतून नाना पटोले पिछाडीवर
  • 9.50 - नागपुरात १२ पैकी ४ जागांवर काँग्रेस आघाडीवर
  • 9.30- सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार हे आघाडीवर आहेत.
  • 9.15 - अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे बच्चू कडू आघाडीवर
  • 8.55 - अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर
  • 8.50 - कोटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर
  • 8.50 - नागपूर पश्चिम-दक्षिण मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत
  • 8.45- नागपूर विभागात महायुतीची 10 जागांवर आघाडी
  • 8.40 - बडनेरा मतदारसंघातून आघाडीचे रवी राणा आघाडीवर
  • 8.30 - नागपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात

विदर्भच्या राजकारणावर कायम काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली. काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा फटका पक्षाला बसला, आणि त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपने विदर्भात सध्या भक्कम पाय रोवले आहेत.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे २०१४ च्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. गेल्या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपला ६२ पैकी ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे पाहायला मिळाले. तर काँग्रेसला १०, शिवसेनेला ४, राष्ट्रवादी १ तर इतर ३ अशा जागा मिळाल्या होत्या.

महत्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात

मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रवी राणा, अनिल बोंडे, लोकसभेत नितीन गडकरींच्या विरोधात लढलेले नाना पटोले त्यांच्या पारंपारिक साकोली मतदारसंघातून लढत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख उभे आहेत.

भाजप ५० तर सेना १२ जागा

यावेळी विदर्भात भाजप ५० जागा लढवत आहे. तर शिवसेना १२ जागावर लढत आहे.

नागपूर विभागातल्या ३२ जागांपैकी २८ जागा भाजप, तर ४ जागा शिवसेना, २४ जागा काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागा लढवत आहे. अमरावती विभागातल्या ३० जागांपैकी २१ जागा भाजप, शिवसेना ९, काँग्रेस २१, राष्ट्वादी काँग्रेस ७, (आघाडीने २ जागा मित्रपक्षाला दिल्या आहेत. बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमानीचे रवी राणा हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार आहेत) वंचित बहुजन आघाडी २७ जागा लढवत आहे.
महत्वाचे मुद्दे

संघाचं कार्यालय

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. त्यामुळे भाजपचे अनेक बडे नेते येथून आले आहेत. संघाच्या मदतीनेच भाजपने विदर्भात आपली ताकद वाढवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विदर्भात मोठी ताकद आहे.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा

विदर्भाचे राजकारण म्हटल. सर्वात जास्त चर्चिला जाणार विषय म्हणजे वेगळा विदर्भ. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतर भाजपच्या नेत्यांनी या मुद्याकडे लक्ष दिले नाही.

दुष्काळाचा प्रश्न

शेतकऱ्यांच्या समस्या हा विदर्भातील राजकारणाचा एक महत्वाचा मुद्दा आहे. काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळे ओला दुष्काळ पडतो. तर काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे. शेतमालाला भाव देण्याचा प्रश्न आहे.

बेरोजगारीचा मुद्दा

विदर्भातील अनेक जिल्ह्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही सत्तेत आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देऊ असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न विदर्भात निर्माण झाला आहे.

महत्वाच्या लढती

  • नागपूर दक्षिण पश्चिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) VS आशिष देशमुख (काँग्रेस)
  • बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) VS डॉ. विश्वास झाडे (काँग्रेस)
  • साकोली - नाना पटोले (काँग्रेस) VS परिणय फुके (भाजप)
  • ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवर (काँग्रेस) VS पारोमिता गोस्वामी (आप)
  • बडनेरा - रवी राणा (अपक्ष) VS प्रीती बंड (शिवसेना)
  • मोर्शी - डॉ. अनिल बोंडे (भाजप) VS देवेंद्र भुयार (शेतकरी संघटना)
  • आर्वी - अमर काळे (काँग्रेस) vs दादाराव केचे (भाजप)
  • देवळी - रणजित कांबळे (काँग्रेस) vs समीर देशमुख (शिवसेना)
  • अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले (भाजप) vs मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
  • अहेरी - अंबरिश अत्राम (भाजप) vs धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
  • आर्णी - संदीप धुर्वे (भाजप) vs शिवाजीराव मोघे (काँग्रेस) vs राजू तोडसाम (भाजप बंडखोर)
  • पुसद - निलय नाईक (भाजप) vs इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
  • तिवसा - यशोमती ठाकूर (काँग्रेस) vs राजेश वानखडे (शिवसेना)

2014 ची परिस्थिती

नागपूर विभागात ३२ पैकी २६ जागा भाजपला

नागपूर विभागात विधानसभेच्या ३२ जागा आहेत. यामध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती. यावरून नागपूर विभागात भाजपचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते आहे.नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी भाजपने ११ जागांवर विजय मिळवला होती. तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील तीनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यात ४ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत ३ जागा भाजपला, तर १ जागा काँग्रेसला मिळाली होती. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून तिनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या ६ जागा असून, यामध्ये ४ भाजप, १ काँग्रेस तर १ जागा शिवसेनेला मिळाली होती. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वर्धा जिल्ह्यात २ काँग्रेसच्या तर २ भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या.

अमरावती विभागात ३० पैकी १८ जागा भाजपला -

अमरावती विभागातल्या ५ जिल्ह्यात विधानसभेच्या ३० जागा आहेत. यामध्ये १८ जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेच्या ७ जागा आहे. यामध्ये भाजपचे ३, काँग्रेसचे २ तर शिवसेनेचे २ जागांवर वर्चस्व आहे. तसेच अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या ५ जागा आहेत. यापैकी ४ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर एका जागेवर भारीपचे वर्चस्व आहे. वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून २ जागा भाजपच्या तर एक जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. अमरावती जिल्ह्यातल्या ८ जागांपैकी ४ जागांवर भाजपचे २ जागांवर काँग्रेस तर २ जागांवर अपक्ष आमदार आहेत. अपक्षांमध्ये रवी राणा हे बडनेरा विधानसभेचे आमदार आहेत. तर बच्चू कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही भाजपचे वर्तस्व असल्याचे पाहायला मिळते. तेथील ७ जागांपैकी ५ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा आहे. एकूणच विदर्भाची राजकीय स्थिती बघितली तर भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. यावेळच्या विधनसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Intro:Body:

विदर्भात कोण मारणार बाजी? भाजपच्या वर्चस्वाला आघाडी देणार का धक्का

मुंबई -   विधानसभेच्या २८८ जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून चालू असलेला १४ व्या विधानसभेचा रणसंग्राम आज संपणार आहे. भाजप सेनेची युती पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. विदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन प्रशासकीय विभाग आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं. त्यामुळे विदर्भाला प्रशासकीय दृष्ट्या देखील महत्त्व आहे. सत्ता स्थापनेसाठी महत्वाचा विभाग म्हणून विदर्भाकडे पाहिले जाते. जो पक्ष विदर्भात बाजी मारेल त्याचा सत्ता स्थापनेचा माग्र सुकर होणार आहे. 

विदर्भच्या राजकारणावर कायम काँग्रेसचा वरचष्मा होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली. काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीचा फटका पक्षाला बसला, आणि त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपने विदर्भात सध्या भक्कम पाय रोवले आहेत. 

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे २०१४ च्या निवडणुकीत स्पष्ट झाले होते. गेल्या निवडणुकीत चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी  भाजपला ६२ पैकी ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विदर्भात भाजपची मोठी ताकद असल्याचे पाहायला मिळाले. तर काँग्रेसला १०, शिवसेनेला ४, राष्ट्रवादी १ तर इतर ३ अशा जागा मिळाल्या होत्या. 

महत्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात

मुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रवी राणा, अनिल बोंडे, लोकसभेत नितीन गडकरींच्या विरोधात लढलेले नाना पटोले त्यांच्या पारंपारिक साकोली मतदारसंघातून लढत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख उभे आहेत.

भाजप ५० तर सेना १२ जागा

यावेळी विदर्भात भाजप ५० जागा लढवत आहे. तर शिवसेना १२ जागावर लढत आहे. 

नागपूर विभागातल्या ३२ जागांपैकी २८ जागा भाजप, तर ४ जागा शिवसेना, २४ जागा काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागा लढवत आहे.

अमरावती विभागातल्या ३० जागांपैकी २१ जागा भाजप, शिवसेना ९, काँग्रेस २१, राष्ट्वादी काँग्रेस ७, (आघाडीने २ जागा मित्रपक्षाला दिल्या आहेत. बडनेरा मतदारसंघातून युवा स्वाभिमानीचे रवी राणा हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार आहेत) वंचित बहुजन आघाडी २७ जागा लढवत आहे. 

महत्वाचे मुद्दे

संघाचं कार्यालय

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. त्यामुळे भाजपचे अनेक बडे नेते येथून आले आहेत. संघाच्या मदतीनेच भाजपने विदर्भात आपली ताकद वाढवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विदर्भात मोठी ताकद आहे.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा

विदर्भाचे राजकारण म्हटल. सर्वात जास्त चर्चिला जाणार विषय म्हणजे वेगळा विदर्भ. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता स्थापनेनंतर भाजपच्या नेत्यांनी या मुद्याकडे लक्ष दिले नाही.

दुष्काळाचा प्रश्न

शेतकऱ्यांच्या समस्या हा विदर्भातील राजकारणाचा एक महत्वाचा मुद्दा आहे. काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळे ओला दुष्काळ पडतो. तर काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे. शेतमालाला भाव देण्याचा प्रश्न आहे.

बेरोजगारीचा मुद्दा

विदर्भातील अनेक जिल्ह्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आम्ही सत्तेत आल्यावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देऊ असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न विदर्भात निर्माण झाला आहे.

2014 ची परिस्थिती

नागपूर विभागात ३२ पैकी २६ जागा भाजपला

नागपूर विभागात विधानसभेच्या ३२ जागा आहेत. यामध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती. यावरून नागपूर विभागात भाजपचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते आहे.नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी भाजपने ११ जागांवर विजय मिळवला होती. तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील तीनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यात ४ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत ३ जागा भाजपला, तर १ जागा काँग्रेसला मिळाली होती. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून तिनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या ६ जागा असून, यामध्ये ४ भाजप, १ काँग्रेस तर १ जागा शिवसेनेला मिळाली होती. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वर्धा जिल्ह्यात २ काँग्रेसच्या तर २ भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या.

अमरावती विभागात ३० पैकी १८ जागा भाजपला -

अमरावती विभागातल्या ५ जिल्ह्यात विधानसभेच्या ३० जागा आहेत. यामध्ये १८ जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेच्या ७ जागा आहे. यामध्ये भाजपचे ३, काँग्रेसचे २ तर शिवसेनेचे २ जागांवर वर्चस्व आहे. तसेच अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या ५ जागा आहेत. यापैकी ४ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर एका जागेवर भारीपचे वर्चस्व आहे. वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून २ जागा भाजपच्या तर एक जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. अमरावती जिल्ह्यातल्या ८ जागांपैकी ४ जागांवर भाजपचे २ जागांवर काँग्रेस तर २ जागांवर अपक्ष आमदार आहेत. अपक्षांमध्ये रवी राणा हे बडनेरा विधानसभेचे आमदार आहेत. तर बच्चू कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही भाजपचे वर्तस्व असल्याचे पाहायला मिळते. तेथील ७ जागांपैकी ५ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा आहे.एकूणच विदर्भाची राजकीय स्थिती बघितली तर भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. यावेळच्या विधनसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेंबाधणी केली आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.