नागपूर - स्वतःची महागडी हौस पूर्ण करण्यासाठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन वारांगणांना गुन्हे शाखेने सोडविले आहे. इंदोर आणि कोलकातामधून या वारांगणांना नागपुरात व्यवसायासाठी आणले होते. सीए रस्ता परिसरातील हॉटेल ओयो टाऊनमध्ये छापेमार कारवाई करत या काळ्या बाजाराची पोल खोल गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, चाकू भोकसून कापली जीभ
एक तरुणी एअर होस्टेजसचे (हवाई सुंदरी) प्रशिक्षण घेत होती तर दुसरी तरुणी ही खासगी कंपनीमध्ये कार्यरत होती. दोन्ही तरुणी या चांगल्या कुटुंबातील आहेत, अशी माहिती समोर येत आहे. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २६ वर्षीय सुल्तान पसवानी आणि त्याचे साथीदार रजत डोंगरे आणि निलेश नागापूरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - कमलनाथ सरकार धोक्यात? मध्य प्रदेशमध्ये भाजपचे 'ऑपरेशन लोटस' सुरू