ETV Bharat / state

Pilot Death: नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू, विमानात चढण्यापूर्वीच काळाचा घाला - विमानात हृदयविकाराचा झटका

आज नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. मनोज सुब्रमण्यम वैमानिकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

Pilot Died
नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 17, 2023, 4:54 PM IST

Updated : Aug 17, 2023, 8:08 PM IST

नागपूर : नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. वैमानिक नागपूरहून पुण्याला विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र, विमानात चढण्यापूर्वीच ते बोर्डिंग गेटजवळ बेशुद्ध पडले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने वैमानिक कॅप्टन मनोज सुब्रमण्यम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वैमानिकाचा मृत्यू झाला असला तरी पुढील मोठा अनर्थ टळल्याची चर्चा आहे.

विमानात हृदयविकाराचा झटका : भारतात दोन दिवसांत वैमानिकाचा हा दुसरा मृत्यू आहे. कतार एअरवेजच्या पायलटला बुधवारी विमानात हृदयविकाराचा झटका आला होता. याआधी स्पाईसजेट, अलायन्स एअर आणि सहारामध्ये काम केलेल्या वैमानिकाला दिल्ली-दोहा फ्लाइटच्या पॅसेंजर केबिनमध्ये प्रवास करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले होते.

मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले : दुसरीकडे मिग-२१ हे भारतीय हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना ( MiG 21 Accident in Jaisalmer ) घडली होती. विमान राजस्थानमधील जैसलमेरजवळ नॅशनल पार्कजवळ कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा ( Wing Commander Harshit Sinha death ) मृत्यू झाला होता. ही घटना डिसेंबर 2021 रोजी जयपूर येथे घडली होती.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - कॅप्टन मनोज सुब्रमण्यम हे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या बोर्डिंग गेटवजळ बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना नागपूरच्या KIMS-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तपासून डॉक्टरांनी मनोज यांना मृत घोषित केले आहे. हृदयाचे कार्य अचानक कमी झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

अपघातात सीडीएस रावत यांनीही गमाविले प्राण : हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा (८ डिसेंबर ) तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला होता. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.

हेही वाचा -

  1. Cheetah helicopter crashed: अरुणाचल प्रदेशात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकाचा मृत्यू
  2. Gas Geyser Accident Nashik : गॅसगिझर गळतीने महिला वैमानिकेचा मृत्यू; नाशिकमधील पंधरा दिवसातील दुसरी घटना
  3. MIG 21 Accident in Jaisalmer : मिग-२१ जैसलमेरमध्ये कोसळले; वैमानिकाचा मृत्यू

Last Updated : Aug 17, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.