ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar Jayanti: नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायींकडून अभिवादन अस्थीकलशाचे दर्शन घेऊन महामानवाचा जयघोष - Diksha Bhoomi In Nagpur

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात आले. सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आहेत. यावेळी भीम अनुयायांनी महामानवाचा जयघोष केला. त्याचबरोबर विविध बौद्ध संघटनांसह समता सैनिक दलातर्फे अभिवादन करण्यात आले.

Babasaheb Ambedkar Jayanti
नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांकडून अभिवादन
author img

By

Published : Apr 14, 2023, 2:13 PM IST

आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांकडून अभिवादन

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आहे. नागपुरातही आंबेडकर जयंती धडाक्यात साजरी करण्यात आली. आज सकाळपासून दीक्षाभूमीवरही हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी दाखल झाले होते. तसेच शहरातील संविधान चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागपूरकर दाखल झाले होते. सकाळी पवित्र दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

दीक्षाभूमीचा इतिहास: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ अशा मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली गेली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभरण्यात आला होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली, अशी भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची 14 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर 1978 साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले.

दीक्षाभूमीवरील स्तूप वेगळा: दीक्षाभूमीवर मोठ्या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर स्तूप हे प्राचीन सोपान पेक्षा वेगळे आहे. प्राचीन काळात सम्राट अशोकांनी अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप भरीव स्वरूपातील होते. मात्र, दीक्षाभूमीवर असलेला स्तूप आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थी कलश ठेवण्यात आला आहे. तर बाजूला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या बाजूला डॉ. आंबेडकर यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शन आहे.

बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा: मुंबईच्या चैत्यभूमी येथे जाणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील हजारो अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येतात असतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषत आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ. बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही आहेत.

हेही वाचा: Babasaheb Ambedkar Jayanti शांतीवन चिचोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृति संग्रहालयात बाबासाहेबांच्या विविध वस्तुचे जतन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.