नागपूर - अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आज (27 ऑगस्ट) माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नागपूर येथील संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
मोहन भागवत आणि उमा भारती यांच्यात दोन तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील सांगण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नकार देण्यात आला असला तरी अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या अनुशंगाने तसेच राजकीय मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे मध्यप्रदेश येथील राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया व खासदार साक्षी महाराज यांनीही संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. आज माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनीही सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याने राजकीय पटलवार तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा - धनदांडग्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अटक