नागपूर : आशिष देशमुख २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर काटोल मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देत आशिष देशमुख यांनी काँग्रेसची वाट धरली होती. या पुनर्प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की 2009 मध्ये नितीन गडकरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश केला होता.
नितीन गडकरी यांची महत्वाची भूमीका : त्यावेळी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण जेव्हा निवडणुका लागल्या मला भाजपाने, सावनेर विधानसभेची निवडणूक लढण्याची उमेदवारी दिली. तेव्हा ते थोड्याशा मतांनी मी निवडणूक हरलो. तरी 2014 मध्ये काटोल येथून निवडून आलो. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये नितीन गडकरी यांची महत्वाची भूमीका राहिली आहे. ते पितृतुल्य आहेत आणि त्यांचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी आहे. मी माझी भूमिका याआधी देखील जाहीर केली होती. की माझी राजकीय वाटचाल ही एकाचं मतदारसंघापूर्ती राहणार नाही. संपूर्ण विदर्भाचं व्यापक हित लक्षात घेऊन असेल.
नाना बद्दल काँग्रेसजनांमध्ये रोष : नाना पटोले यांच्यासंदर्भात राज्यातील काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही फार मोठी नाराजी आहे. मी ती नाराजी जगजाहीर करत होतो. विदर्भ असो की पश्चिम महाराष्ट्र असो येथील काँग्रेसजनांचा आक्रोश प्रदेशाध्यक्षांंबद्दलचा तो आज बाहेर आलेला आहे. प्रदेशाध्यक्ष नानांसंदर्भातील अंतिम निकाल हे काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहे. मी आता काँग्रेस पक्षात नसल्याने यावर अधिक बोलणं योग्य होणार नाही.
ओबीसी आणि विदर्भाच्या हिताचे काम करणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच जाहीर केले आहे की मी कोणत्याही आमदारकीचा किंवा खासदारकीची मागणी केलेली नाही. कार्यकर्ता म्हणून देखील काम करण्याची जर, गरज पडली तर ओबीसींसाठी, विदर्भाच्या हितासाठी आशिष देशमुख नक्कीच कार्यरत राहील असं ते म्हणाले आहे.