नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गृह मंत्री अनिल देशमुख शंभर कोटी वसुली प्रकरणात यांना जामीन मिळाल्यानंतर तब्बल 21 महिन्यांच्या प्रदीर्घ कलखंडानंतर ते स्वगृही नागपूरला परत आले आहेत. 20 महिन्यांचा न्यायालयीन लढा जिंकून त्यांची घरवापसी झाली आहे. देशमुख यांच्या समर्थकांनी 'संघर्ष योद्धा' या आशयाचे बॅनर संपूर्ण नागपूर शहरात लावले आहेत. ते तब्बल 14 महिने कारागृहात होते. अनिल देखमुख यांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देशमुख यांच्या डोळ्यांच्या कडाही या जल्लोषाने पाणावल्या होत्या.
नागपूरात जल्लोषात स्वागत : अनिल देशमुख यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्यावर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आहे. 12 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला. तरी देखील कारागृहाबाहेर येण्यासाठी 28 डिसेंबरचा दिवस उजेडावा लागला होता. त्यानंतर अखेर आज अनिल देशमुख नागपूरला परतले आहे. अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ईडीने लावलेल्या आरोपातही तथ्य नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते.
तब्बल 14 महिन्यानंतर तुरूंगाबाहेर : अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसली प्रकरणात आरोप झाल्यानंतर ते अनेक दिवस समोर आले नाही. ते अखेर १ नोव्हेंबर २०२१ रोजी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले असता ईडीने त्यांना अटक केली. या काळात ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. ईडीनंतर सीबीआय देखील त्यांच्या विरोधात आरोप सिद्ध करू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, जामिनाविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सीबीआयची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. सीबीआयला मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार दिल्यांनतर सव्वा वर्षानंतर म्हणजेच तब्बल 14 महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत.
तब्बल 109 वेळा छापे : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरी, ऑफिस यासह निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर ईडीसह अनेक तपास यंत्रणांनी तब्बल १०९ वेळा धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे ईडीने एकप्रकारे वर्ल्ड रेकॉर्ड केला असल्याची टीका देखील यावेळी करण्यात आली होती. 109 वेळा देशमुख यांच्या कुटुंबियांवर छापेमारी केल्यानंतर देखील ठोस असे काहीही सापडल नाही यावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते.
काय आहे प्रकरण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा : Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकर यांनी केला आईसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न; ओतले अंगावर पेट्रोल