ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे वाचवले प्राण; जखमी प्रवाशाला रुग्णालयात केले दाखल - Eknath shinde latest marathi news

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी प्रवाशाला रुग्णालयात दाखल केलं.

cm eknath shinde himself took the injured patient to the hospital
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे वाचवले प्राण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 8:24 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे वाचवले प्राण

नागपूर CM Eknath Shinde : मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडं परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन ट्रक हा बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक कारही येऊन धडकली. या अपघातानंतर कारमधील काही प्रवासी जखमी झाले.

  • गिरीश केशरावजी तिडके असे जखमी तरुणाचे नाव आहे. मुख्यमंत्री@mieknathshinde
    स्वतः त्याला नागपुरातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. अपघातातील अन्य जखमी वंदना राकेश मेश्राम, रंजना शिशुपाल रामटेके, शुद्धधन बाळूजी काळपांडे सर्वजण रा. नागपूर यांनाही रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. pic.twitter.com/8oT0dT7aSu

    — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अपघात झाल्याचं कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथं थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. तरुण गंभीर जखमी असल्यानं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका दिली. ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. दरम्यान, या तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

जखमींवर उपचार सुरू : गिरीश केशरावजी तिडके (रा. गोंड खैरीवाडी, नागपूर) असे जखमी तरुणाचं नाव आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.

  • जखमींसोबत मुख्यमंत्री रुग्णालयात गेले : जखमी तरुणाला ट्रकखालून बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः तेथे उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -

  1. केंद्र सरकारच्या 'त्या' निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मानले आभार
  2. मुंबई महापालिकेची डीप क्लिनिंग मोहीम योग्य दिशेनं; 1200 मेट्रीक टन कचरा जमा
  3. राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त? 'या' आमदारांची नावे चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.