मुंबई - दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाचे Disha Salian Death Case आज विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. दिशा प्रमाणेच खासदार राहूल शेवाळे SIT Against Mp Rahul Shewale यांच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी नेमा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी विधानपरिषदेत केली. उपसभापती नीलम गोऱ्हे Deputy Speaker Neelam Gorhe यांनी ही मागणी मान्य करत, राज्य शासनाला एसआयटी Neelam Gorhe instructions Form SIT Against Mp Rahul Shewale चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे खासदार राहुल शेवाळे यामुळे गोत्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहूल शेवाळेंनी संसदेत मांडला दिशा सालीयन प्रकरणाचा मुद्दा शिंदे गटाचे आमदार राहूल शेवाळे SIT Against Mp Rahul Shewale यांनी संसदेत, दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाचा Disha Salian Death Case मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य विधीमंडळात तो चांगलाच गाजत आहे. शिंदे गटाच्या आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत एसआयटी नेमण्याची मागणी केली. सभागृह दोन वेळा तहकूब केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांनी एसआयटीची घोषणा केली. विधान परिषदेतही भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी दिशा सालीयन प्रकरण उचलून धरले.
राहुल शेवाळे अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाकडे तक्रार ठाकरे गटाच्या आमदारांनी खासदार राहूल शेवाळे Neelam Gorhe instructions Form SIT Against Mp Rahul Shewale यांनी एका महिलेवर केलेल्या अत्याचार प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मनीषा कायंदे म्हणाल्या की, संबंधित महिलेने मुंबई पोलीस, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्र आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. जीवाला धोका असल्याचे पीडितेने या तक्रारीत म्हटले आहे. तसेच खासदार शेवाळेकडून SIT Against Mp Rahul Shewale सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असून मुंबईत येण्यास मनाई करत आहे. लोकसभेच्या सचिवांना भेटू देत नाहीत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले आहे. त्यामुळे दिशा सालीयन प्रमाणे खासदाराच्या प्रकरणात एसआयटी Neelam Gorhe instructions Form SIT Against Mp Rahul Shewale नेमा, अशी मागणी विरोधकांनी केली. उपसभापतींनी ही मागणी मान्य करत, राज्य सरकारला एसआयटी नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
गोंधळामुळे नीलम गोऱ्हेंचा पारा चढला विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी देखील आरडाओरड सुरु ठेवल्याने सभापती नीलम गोऱ्हे यांचा पारा चांगलाच वाढला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil यांना सत्ताधाऱ्यांना कामकाज करायचे आहे की नाही, असा सवाल त्यांनी विचारला. तरीही सत्ताधाऱ्यांकडून चौकशीची मागणी सुरुच राहिल्याने लोकप्रतिनिधींना जनतेच्या मागण्यांची काही पर्वा नाही. केवळ राजकीय विरोधासाठी सभागृहाला वेठीस धरले जात असल्याचे सांगत गोऱ्हे Deputy Speaker Neelam Gorhe सर्वपक्षीय सदस्यांवर चांगल्याच भडकल्या.