नागपूर : नागपुर विभागातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही शिक्षक परिषद लढवीत ( Teacher Constituency Election Nagpur ) असते. भारतीय जनता पक्ष शिक्षक परिषदेला पाठिंबा देते. यंदा भाजपमध्ये अनेक उमेदवार इच्छुक ( BJP Candidate in Teachers Constituency Election ) आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार देणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात बोलत होते.
ना.गो गाणार यांच्या नावाची चर्चा : याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले ( Deputy CM Devendra Fadnavis ) असता ते म्हणाले की याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल ते नागपूर बोलत होते. कालचं भाजप नेत्यांची महत्वपूर्ण बैठक नागपूरच्या भाजप कार्यालयात पार पडली असून शिक्षक परिषदेचे उमेदवार माजी आमदार ना.गो गाणार यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली ( BJP Support former MLA Na Go Ganar ) आहे.
निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाचा यात समावेश आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच भाजपने जाहीर केली आहे. नागपूर विभागातून भाजप समर्थीत नागो गाणार हे गेल्या दोन टर्मपासून प्रतिनिधित्व करीत असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अनेक इच्छुक उमेदवार असतानाही सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी भाजप तर्फे निश्चित मानली जात आहे.
३० जानेवारीला मतदान : निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जारी झाली आहे, 12 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार,16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार, तर 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारी ला मतमोजणी होणार आहे.
भाजपकडून अनेकांना उमेदवारीची अपेक्षा : नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही शिक्षक परिषद लढवत असली तरी भाजपमध्ये अनेक इच्छुक आहेत. यामध्ये भाजपच्या सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक प्रा. संजय भेंडे, माजी महापौर प्रा. कल्पना पांडे, शिक्षक परिषदेचे सचिव योगेश बन यांची नावे चर्चेत आहेत. संजय भेंडे यांचे यापूर्वीच्या नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्येही त्यांचे नाव चर्चेत आले. माजी आमदार सुधाकर कोहळे यांनीही मोर्चेबांधणी केली असल्याचे समजते.