नागपूर - जागतिक संकट म्हणून आता कोरोना विषाणूकडे पाहिले जात आहे. जीवघेण्या या विषाणूची झळ देशातील कुक्कुटपालन उद्योगासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्याना बसलेली आहे. त्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. इतर उद्योगांप्रमाणे देशभरातील पर्यटन व्यवसायावरही कोरोनाचा फटका बसला आहे.
कोरोनाची सर्वत्र दहशत वाढली आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांनी आपली यात्रा रद्द केली आहे. विदर्भातील हिरवळ आणि सौदर्य अनुभवण्यास आतुर असलेल्या पर्यटकांनी कोरोनाची धास्ती घेतल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. परदेशातुन येणाऱ्या पर्यटकांसाठी सरकारने नो एन्ट्री चा बोर्ड आता लावला असला तरी त्याआधीच परदेशी पर्यटकांची संख्या 50 टक्के पेक्षा कमी झाली आहे. तर, देशी पर्यटकांच्या संख्येत देखील 25 ते 40 टक्यांची घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे ट्रॅव्हल ऐजेंट आणि पर्यटनावर निर्भर व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा -पुण्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२ वर
कोरोना विषाणूची जेवढी दहशत नागरिकांमध्ये दिसत आहे, त्यापेक्षा अधिक उद्योगधंद्यांवर याचा परिणाम दिसू लागला आहे. नागपूर आणि विदर्भाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल सफारी आहेत. त्याच सोबत इतर पर्यटनाची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहेत. नागपूर हे शहर देशाच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे देशविदेशातून विदर्भात येणाऱ्या बऱ्याच पर्यटकांनी आपला टूर रद्द केला आहे.
नागपूरच्या शेजारी असलेल्या परिसरात ताडोबा, पेंच, मेळघाट, कारांडाला, नागझिरा, नवेगाव बांध, बाजूला असलेला कान्हा केसरी या व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, यंदा ही संख्या कमी झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत यंदा 24 ते 40 टक्के घट झाल्याचे ट्रॅव्हल एजेंट सांगतात.
हेही वाचा -दुबईवरुन यवतमाळमध्ये आलेल्या 'त्या' 9 जणांना आयसोलेशन वार्डमध्ये हलवले