ETV Bharat / state

लसींच्या तुटवड्यामुळे नागपुरात आजही ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नाही - नागपूर

कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने ४५ वर्षावरील नागरिकांचे (आज) शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रांवरून परतावे लागत आहेत.

लसींचा अपुरा पुरवठा
लसींचा अपुरा पुरवठा
author img

By

Published : May 8, 2021, 11:52 AM IST

नागपूर - कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने ४५ वर्षावरील नागरिकांचे (आज) शनिवारी लसीकरण होणार नसल्याचे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना लसीकरण केंद्रांवरून परतावे लागत आहेत.

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण नाही
४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण नाही

लसीकरणाची मोहीम गेल्या काही दिवसांपासून फारच संथ गतीने सुरू आहे. आवश्यक प्रमाणात लस मिळत नसल्याने आठ दिवसांपासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण ठप्प पडले आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊ लागली आहे. आजही ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण जरी होणार नसले तरी राज्य शासनाच्या निर्देशानुसार १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी ६ केंद्र शहरात सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये कोव्हॅक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) तसेच पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा येथे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात येईल. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

लस पुरवठा झाल्यास लसीकरण सुरू...

४५ वर्षावरील वयोगटाचे सर्व नागरिकांचे लसीकरण शनिवारी होणार नाही. लसचा पुरवठा न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लसचा मुबलक पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.