नागपूर - सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन मोहिमेत सहभागी असणाऱ्यांच्या आणि भाजपच्या विचारसरणीत फारसा फरक नाही. आरक्षणामुळे मेरिट नाकारले जाते ही समजूत चुकीची आहे. मेरिट विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असे भाजप उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले.
'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'साठी अमरावतीत महामोर्चा; खुल्या प्रवर्गातील गुणवंतांचे नुकसान
महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. व्होट बँकेसाठी सरकार चुकीचे धोरण राबवित आहे, असे आरोप करत ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहे. तसेच सेव्ह मेरिट सेव्ह नेशन असे नारे लावले जात आहे. त्यावरच सहस्त्रबुद्धे बोलत होते. भाजप सरकारने शासकीय सेवेतील मेरीट आणि आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला होता. त्यामुळे मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'; ज्यांना गरज त्यांनाच आरक्षण हवं, बीडमध्ये विराट मोर्चा
काश्मीरमधील कलम ३७० बद्दल इतर लोक फक्त बोलत होते. मात्र, भाजपने त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करत योग्य निर्यण घेतला असल्याचे ते म्हणाले.