ETV Bharat / state

Anil Deshmukh News: निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगली घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो- अनिल देशमुख

निवडणुका तोंडावर असल्या की मोठ्या दंगली घडवून त्याचा राजकीय फायदा घेतला जातो. नागरिकांनी याला बळी पडू नये. जनतेने असे प्रयत्न ओळखावे आणि पराभूत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Jun 7, 2023, 1:55 PM IST

Updated : Jun 7, 2023, 2:00 PM IST

सरकारने आपल्या काळातील योजनांच्या जाहिराती दाखवाव्या - अनिल देशमुख

नागपूर : समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी जाणीवपूर्वक करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते आज नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहे, असे देखील ते म्हणाले आहे. सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. हे फक्त ४० आमदारांना सांभाळण्यासाठी होत आहे. कोणाला मंत्री करायचे? हे त्यांचे विषय आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

एकेरी भाषेतील वक्तव्य करू नये : राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात बोलताना एकेरी शब्दात बोलणे हे योग्य नाही. सुधीर मुनगंटीवार राज्यातील वरिष्ठ नेते आहे. त्यांनी शरद पवार याच्याबद्दल असे एकेरी भाषेतील वक्तव्य करू नये. खासदार तुमाने ह्यांनी ही अजित पवार यांच्याबद्दल भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, अजित पवार यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. तुमाने यांना आरोप सिद्ध करण्याचे आवाहन अजित पवार यांनी दिले आहे. ते खासदार तुमानेंनी आवाहन स्वीकारावे आणि आरोप सिद्ध करून दाखवावे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.

या सरकारने स्वत:च्या कामांची जाहिरात करावी- माजी गृहमंत्री अनिल देशमुख

आपल्या काळातील योजनांची जाहिराती करावी : अजित पवार यांनी सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या टिव्हीवरील जाहिरातीचा मुद्दा उचलला आहे. त्यांचे आरोप खरे आहे. संजय गांधी निराधार योजना मुळात 65 वर्षांवरील लोकांसाठी आहे. विद्यमान सरकारच्या जाहिरातीत संजय गांधी निराधार योजनेतील जाहिरातीत तरुण वर्ग दाखवला आहे. तसेच रोजगार हमी योजनेची जाहिरात दाखवली जात आहे. ती योजना काँग्रेस सरकारच्या काळात आली आहे. या सरकारने किमान आपल्या काळातील योजनांच्या जाहिराती दाखवाव्या. स्वत:च्या कामांची जाहिरात करावी, असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. Tirupati temple : नवी मुंबईतील बालाजी मंदिराचे बांधकाम सुरू, शिंदे-फडणवीसांच्या हस्ते भूमीपूजन
  2. Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्तार करताना रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपदाची संधी द्यावी- रामदास आठवले
  3. Rohit Pawar Criticized: रोहित पवार स्वपक्षीयांवरच कडाडले, शरद पवारांच्यावर बोलणाऱ्यांविरोधात नेते गप्प का, रोहित पवारांचा सवाल

Last Updated : Jun 7, 2023, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.