ETV Bharat / state

टायरचा धूर करा, बँड वाजवा, फटाके फोडा आणि टोळधाड पळवा - गृहमंत्री

author img

By

Published : May 31, 2020, 11:54 AM IST

पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडींनी नागपूरसह विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. या कीटकांनी संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे.

anil deshmukh on locust attack vidarbh agriculture
टायरचा धूर करा, बँड वाजवा, फटाके फोडा आणि टोळधाड पळवा - गृहमंत्री

नागपूर - पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्य प्रदेश मार्गे राज्यात आलेल्या टोळधाडींनी नागपूरसह विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला. या कीटकांनी संत्रा, मोसंबी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. ज्या भागात टोळधाडीचा हल्ला झाला आहे, त्या भागातील नागरिकांनी सतर्क राहून टायरचा धूर केला, बँड वाजवला किंवा फटाके फोडले तर हा धोका कमी होऊ शकतो, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. टोळधाडीने शेकडो एकर वरील पीक फस्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली.

गृहमंत्री अनिल देशमुख टोळधावर विषयावर बोलताना...

पाहणीदरम्यान, कृषी अधिकारी यांना तातडीने फवारणी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे कमीत कमी नुकसान झाले पाहिजे, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश, गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

हेही वाचा - कंटेन्मेंट झोनबाबत केंद्रीय आरोग्य खात्याच्या निर्देशानुसारच निर्णय घेतले जातील; आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले स्पष्ट

हेही वाचा - नागपूर शहरात ७९ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पाचशे पार, मंदावलेली आकडेवारी वाढतीय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.