नागपूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे २७ एप्रिलला उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस या संस्थेचे मुख्य संरक्षक देखील आहेत.आपल्या देशात महामारीच्या प्रमाणात कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, हे ओळखून, डॉ. आबाजी थत्ते सेवा और अनुसंधान संस्था (ट्रस्ट)च्या नियामक मंडळाने कर्करोग निदान, प्रतिबंध आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी उपचारांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. कर्करोगाला हरवायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही संस्था काम करते.
470 बेड्सचे रुग्णालय- रुग्णाची काळजी आणि शाश्वत उपचार हा या आजारावरील उपाय आहे. कर्करोग संस्थेच्या ध्येयाचे बेरीज करणारे हे प्रमुख टप्पे आहेत. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर रुग्णालयात एकूण 25 एकरात सोयी सुव्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. 470 बेड्सचे क्वाटरनरी केअर ऑन्कोलॉजी सेंटर म्हणून प्रस्तावित आहे. त्यामध्ये 9.5 लाख चौरस फूट एवढा बिल्ट-अप एरिया आहे. अंदाजे भविष्यात 700 बेड वाढवता येईल. रुग्णालयाची इमारत अंदाजे 10 स्तरांची आहे.
कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक- कर्करोग हा एक आजार आणि शास्त्रज्ञांसाठी एक आव्हान आहे. मानवजातीसाठी मोठा धोका आणि संकट आहे. कर्करोग हा बहुधा मानवजातीच्या इतिहासाइतकाच जुना आहे. या आजाराबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दलच्या जगभरात लक्षणीय वैज्ञानिक प्रगती झाली आहे. त्यामुळे कॅन्सरचे रुग्ण बरे होऊन जास्त काळ जगत आहेत. तथापि, बहुसंख्य रुग्ण अद्याप पूर्णपणे बरे झाले नाहीत. या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणदेखील अधिक आहे.
का होतो कर्करोग? शरीरातील गुणसूत्र बदलामुळे शरीरात पेशीसमूह अमर्यादित प्रमाणात वाढतात. अशावेळी कर्करोगाची लागण होते. हिप्पोक्रेटिस या ग्रीक विचारवंताने सर्वात प्रथम इसवीसन पूर्व ३७० मध्ये कर्करोगाची माहिती जगाला दिली. जवळपास ३५०० वर्षांपासून कर्करोग समजून घेण्याचा, त्यावर निदान आणि उपचार पद्धती शोधण्यासाठी मानवाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळविता आलेले नाही. असे असले तरी केमोथेरपी, औषधे, योगासन व चांगला आहार यामुळे कर्करोगावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता येते, असा संशोधकांचा दावा आहे.
हेही वाचा-Karnatak Election 2023: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील चामराजनगरमध्ये रोड शो केला