ETV Bharat / state

५ टक्के पाणी दरवाढ ही कायद्यानुसारच, ती कमी करण्याची मागणी निरर्थक - तुकाराम मुंढे

पाणी दरवाढीवरून नागपूर महारानगरपालिकेत आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून पाणी दरवाढीला विरोध केला जात आहे. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर नगरसेवकांनी आंदोलन देखील केले. मात्र, पाणी दरवाढ हे कायद्यानुसारच आहे. त्यात बदल होणे शक्य नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Aug 13, 2020, 8:57 PM IST

नागपूर- महारानगर पालिकेकडून ५ टक्के पाणी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाजप नगरसेवकांचा विरोध आहे. मात्र, हा निर्णय कायद्यानुसार घेतला गेला आहे. अशी प्रतिक्रिया आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. शिवाय जे पाणी दरवाढ रद्द करण्याची मागणी करत आहेत, ती मागणी निरर्थक असल्याचेही आयुक्त मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे, मुंढे विरुद्ध भाजप हा संघर्ष अधिक तिव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे

पाणी दरवाढीवरून नागपूर महारानगरपालिकेत आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून पाणी दरवाढीला विरोध केला जात आहे. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दालनासमोर नगरसेवकांनी आंदोलन देखील केले. मात्र, पाणी दरवाढ हे कायद्यानुसारच आहे. त्यात बदल होणे शक्य नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. शिवाय पाणी दरवाढ रद्द करण्याची मागणी निरर्थक असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. त्याचबरोबर, ५ टक्के दरवाढ करून महारानगर पालिकेला अधिक महसूल मिळणार आहे. या महसुलातून इतर कामे केली जातात, त्यामुळे हा निर्णय रद्द होणार नाही. असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

शिवाय हा निर्णय २०१७ पासून आहे. याला राज्य शासनाची परवानगी आहे. त्यामुळे, याबाबत कोणीही संभ्रमित करू नये, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली. त्याचबरोबर, जे बील दिले गेले आहे त्यानुसारच कारवाई होईल आणि जे भरणार नाही त्यांच्यावर महारानगर पालिकेकडून कारवाई केली जाईल, असेही मुंढे म्हणाले. त्यामुळे, एकीकडे भाजप नगरसेवकांकडून पाणी दरवाढ रद्द करण्याची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे मुंढेंकडून ही दरवाढ रास्त असल्याचे सांगितल्या जात आहे. अशावेळी भाजप विरुद्ध तुकाराम मुंढे हा संघर्ष पुन्हा जोर धरत असल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा- उद्योजकांना माफी आणि सामान्य नागरिकांना शिक्षा; सरकारी धोरणांचा निषेध करत ई-रिक्षा चालकांचे अनोखे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.