ETV Bharat / state

World Tuberculosis Day 2023: मधुमेहाच्या रुग्णांना टीबीचा अधिक धोका; टीबीमुळे ५ लाख भारतीयांचा मृत्यू

२४ मार्च हा दिवस जागतिक क्षय रोग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात सुमारे २० टक्के टीबी रुग्ण मधुमेहाचे आहेत. तर मधुमेहाच्या रुग्णांना टीबी होण्याचा धोका आधिक असतो. असे सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशील बिंद्रू यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : Mar 24, 2023, 9:57 AM IST

World Tuberculosis Day 2023
मधुमेहाच्या रुग्णांना टीबीचा अधिक धोका

मुंबई: देशभरात टीबी या आजाराचे रुग्ण आढळून येतात. टीबी हा आजार संसर्गजन्य आहे. मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांना टीबी होण्याचा धोका दोन ते तीन पटीने अधिक असतो. त्यामुळे मधुमेह या आजारावर वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे. मधुमेहामुळे रुग्नाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. भारतातील ३ पैकी १ व्यक्तीला फुफुसाचा टीबी होतो. तर टीबीमुळे ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

डायबेटीस झालेल्या २० टक्के रुग्णांना टीबी : मधुमेहामुळे टीबी होत असल्याने अशा रुग्णांना हायरिक्स रुग्ण बोलले जाते. मधुमेह झालेल्या २० टक्के रुग्णांना टीबीची लागण झाली आहे. तसेच एचआयव्ही झालेल्या ६० टक्के रुग्णांना टीबीची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य विभाग यांच्यामुळे एचआयव्ही काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र आपल्या राहणीमानामुळे मधुमेह वाढत आहे. यामुळे जगभरात भारत मधुमेहाची राजधानी झाली आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांना टीबी होतो तसेच टीबी झालेल्या रुग्णांना मधुमेह असतो असे समोर आले आहे.

टीबीमुळे ५ लाख मृत्यू : २०२१ मध्ये टीबीमुळे ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. लष्करी आणि मेंदूचा क्षयरोग हा क्षयरोगाचा सर्वात गंभीर प्रकार आहे. क्षयरोग बरा होण्यासाठी लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. वेळेवर उपचार सुरू केल्यास टीबी हा बरा होऊ शकतो. उत्तम पौष्टिक अन्न, उच्च प्रथिनेयुक्त आहार सेवन केल्याने चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होऊन टीबी आजारावर मात करता येऊ शकते. टीबी रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे अत्यंत गरजेचे आहे. औषधांचा प्रतिकार हा क्षयरोगाचा गंभीर प्रकार आहे. क्षयरोग बरा करण्यासाठी औषधांच्या संवेदनशीलतेची लवकर ओळख होणे महत्त्वाचे आहे. टीबी या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत.

क्षयरोगाची कारणे : क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबर कुली नावाच्या जीवाणू मुळे होतो. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार आहे. क्षयरोगाने ग्रस्त व्यक्ती जेव्हा खोकते, शिंकते, बोलते तेव्हा टीबीचे जीवाणू हवेत पसरून जवळच्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. क्षयरोग शोधण्यासाठी आहे. फुफ्फुसाचे क्षयरोगाचे निदान करण्यासाठी थुंकीची तपासणी आणि छातीचा एक्स रे या मूलभूत चाचण्या आहेत. थुंकीची तपासणी (जेनएक्सपर्ट एमटीबी आणि एमटीबी कल्चर) सर्वात महत्वाची आहे. कारण, ती बहु आणि व्यापक औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे निदान करण्यात मदत करते. अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन, बायोप्सी, ब्रोन्कोस्कोपी हे टीबीचे निदान करण्यासाठी इतर तपासण्या आहेत. महत्वाच्या गोष्टी ज्या क्षयरोगाबद्दल सामान्य माणसाला माहिती असायलाच हवी.

कोरोनानंतर टीबीचा धोका: कोरोना होऊन गेल्यानंतर इतरही आजार होत आहेत. कोरोनानंतर खोकल्याचा आजार होत आहे. खोकला होणाऱ्या रुग्णांना टीबी या आजाराचा धोका अधिक असल्याने अशा रुग्णांचे स्क्रीनिंग केले जात आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे कोविड रुग्णांची माहिती उपलब्ध असल्याने त्या रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे. ज्या रुग्णाला खोकल्याचा त्रास असेल अशा रुग्णांनी पालिकेच्या रुग्णालयात आरोग्याची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

टीबी आजार काय आहे : १४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, संध्याकाळी ताप येणे, वजन कमी होणे, कफ मध्ये रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे ही क्षयरोगाची लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या अशा क्षयरोग संशयितांच्या थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी नियुक्त केंद्रांद्वारे मोफत केली जात आहे. अशा रुग्णांना त्यांच्या जवळच्या पालिका आरोग्य केंद्र, दवाखाना अथवा रूग्णालयांमध्ये पुढील तपासणी करण्यासह उपचार केले जात आहेत. ज्या कुटुंबातील लोकांना सक्रिय क्षयरोगाचा त्रास आहे. तसेच क्षयरोगाचा कोणताही पूर्व इतिहास आहे. अशा कुटुंबांनी कुटुंबातील इतर निरोगी सदस्यांमधील क्षयरोगाच्या लक्षणांबद्दल अत्यंत दक्ष राहणे आवश्यक आहे. असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा: World Tuberculosis Day 2023 या रुग्णांना क्षयरोग होण्याचा तीनपट अधिक धोका मुंबईत टीबीमुळे ११ हजार ७६९ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.