ETV Bharat / state

मुलांसाठी महिलेचा संघर्ष, दुसऱ्याच्या मुलांना शाळेत सोडून पूर्ण करताहेत स्वतःच्या मुलांचे शिक्षण

गेल्या १५ वर्षांपासून त्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्याकडे २२ मुले आहेत. त्यांना त्या शाळेत सोडतात. सकाळी ७ वाजता सुरू झालेले काम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. यामधून त्यांना महिन्याला ७ हजार रुपये मिळतात. अंत्यत गरीब परिस्थितीतून त्यांची मुले शिकली. याचा आनंद असल्याचे भक्ती म्हणतात.

महिला दिनविशेष
author img

By

Published : Mar 8, 2019, 7:33 PM IST

मुंबई - शहरातील एका महिलेने दुसऱ्याच्या मुलांना शाळेत सोडून मिळालेल्या तुटपुंज्या पगारावर स्वतःच्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला आहे. आज त्यांची एक मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे, तर मुलगा पदवीचे शिक्षण घेत आहे. ४८ वर्षीय भक्ती वारखंडकर यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

महिला दिनविशेष

भक्ती वारखंडकर यांच्या पतीचा २००३ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पदरात त्यावेळी दोन लहान मुले होती. मुलगा पहिलीला तर मुलगी शिशू वर्गात शिकत होती. पतीच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुलांचे शिक्षण कसे करायचे? उदरनिर्वाह कसा करायचा? असे गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले होते. मात्र, त्या खचल्या नाही. त्यांनी कामाला जाणाऱ्या दाम्पत्यांच्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला दोन मुलांना शाळेत सोडण्याचे काम भक्ती यांना मिळाले. त्यामधून त्यांना ६०० रुपये मिळायचे. त्यांनी तुटपूंज्या पैशातून मुलांना शिकवले.

Intro:मुंबई
दुसऱ्याच्या मुलांना शाळेत सोडून अतिशय अल्प पगारात घर चालवून त्या आईने आपल्या पोटच्या दोन मुलांना शिकवले त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवला. आज त्यांची एक मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे तर मुलगा पदवीचे शिक्षण घेत आहे. पहाटे 5 ला उठून लहान मुलांना शाळेत सोडणे. आजच्या दिवसाला 22 मुलांना सोडण्याचे काम ही आई करते. ही प्रेरणादायी कथा आहे, भक्ती वारखंडकर यांची जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत
Body:48 वर्षीय भक्ती वारखंडकर यांच्या आयुष्यात 2003 साली एक वाईट क्षण आला. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यांच्या पदरात त्यावेळी दोन लहान मूल होती. मुलगा पहिलीला तर मुलगी शिशु वर्गाला होती. त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. मुलाचे शिक्षण कस करायचे उदरनिर्वाह कसा करायचा असे गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. पण त्या खचल्या नाही. त्यांनी कामाला जाणाऱ्या दांपत्याच्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम सुरू केले. सुरवातीला दोन मुलांना शाळेत सोडण्याचे काम भक्ती यांना मिळाले त्यातून त्यांना 600 रुपये मिळायचे. त्यांनी तुटपूजी पैशातून मुलांना शिकवले. गेल्या 15 वर्षांपासून ते मुलांना शाळेत सोडण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्याकडे 22 मुले आहेत. त्यांना ते शाळेत सोडतात. सकाळी 7 वाजता काम सुरू असते ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. यातून त्यांना महिन्याला 7 हजार रुपये मिळतात. असा या आदर्श महिलेकडून सर्वांनी प्रेरणा घेतलो पाहिजे.

2003 साली माझे पती वारले. त्यानंतर नोकरीमधून मिळालेल्या पैशातून एक घर विकत घेतले. पण पोटापाण्यासाठी मी मुलांना शाळेतुन सोडण्याचे काम सूरु केले. सुरवातीला 2 मुलं होती आज 22 आहेत. माझी मूल शिकली यातच माझा आनंद आहे. माझ्या मुलीला 10 वीला 92 टक्के होते. दुःख सुख हे आयुष्यात येत असतात पण खचून जावू नका असे भक्ती सांगतात.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.