मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) त्यांच्या कुटुंबीयांच्या अगदी जवळ असलेली व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) हे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे खाजगी सल्लागार म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर, ठाकरे कुटुंबीयांमधील दरी वाढत ( A scion of the Narvekar Thackeray family ) चालली आहे. शिवसेना फुटल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचे मातोश्री वरील येणे जाणे कमी झाल्याची चर्चा आहे. त्यातच आता मिलिंद नार्वेकर यांना एमसीए निवडणुकीत ठाकरे कुटुंबीयांनी मताचा अधिकार असतानाही मतदान केले नाही. यामुळे पुन्हा एकदा ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.
ठाकरे कुटुंबीयांची मतदानाला अनुपस्थिती - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ( Mumbai Cricket Association Elections ) मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात असताना ठाकरे कुटुंबीयांपैकी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे तिघेही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत. या तिघांना मताचा अधिकार असल्याने मिलिंद नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय येतील अशी शक्यता होती. मात्र. ठाकरे कुटुंबीयांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवून आपली जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांना ठाकरे कुटुंबीयांकडून मतदान झाले नाही याचा अर्थ ठाकरे कुटुंबीयांसाठी आता मिलिंद नार्वेकर हे जवळचे राहिले नाहीत हे स्पष्ट होते अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहेत. मात्र तरीही मिलिंद नार्वेकर यांनी या निवडणुकीत बाजी मारत विजय मिळवला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांशिवाय आता मिलिंद नार्वेकर यांना काही अडचण नाही शिवाय मिलिंद नार्वेकर यांच्या मागे आता वेगळ्या शक्तींचे हात आहेत हे सुद्धा या निमित्ताने दिसून आले.
मतदानाला न येण्यामागे काय आहेत कारणे? मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीच्या अत्यंत जवळ असलेले विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मानले जातात. शिवसेनेच्या अनेक बड्या निर्णयान मागे मिलिंद नार्वेकर यांचा सहभाग होता असे म्हटले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर यांचे शिंदे गटाशी वाढलेले संबंध असलेला संपर्क हा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटल्यानंतर विविध कारणांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी हजेरी लावली होती. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना जाणीवपूर्वक मातोश्री पासून दूर ठेवले जाऊ लागले. मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चाही होती मात्र अद्यापही त्यांनी तशा पद्धतीची अधिकृत घोषणा केलेली नाही असे असले तरी एमसीएच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीसाठी केलेला प्रचार शेलार आणि शरद पवार यांच्या पॅनलमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती या बाबीला कारणीभूत आहेत असे मानले जाते. त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांना मतदान देण्यासाठी ठाकरे कुटुंबीय फिरकले नाहीत. अशी चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांना पक्षात सध्या फारसे स्थान दिले जात नाही. हे सुद्धा शिवसैनिकांच्या लक्षात आले आहे.
नार्वेकर --ठाकरे यांची दोस्ती कायम-- पेडणेकर दरम्यान या संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता त्यांनी मात्र नार्वेकर आणि ठाकरे यांच्यात वितृष्ट आल्याचे खंडन केले आहे. मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे कुटुंबीय यांची दोस्ती कायम आहे. ठाकरे कुटुंबीय निवडणुकीसाठी गेले नाहीत यात काही अन्य बाबी असू शकतात त्याचं कारण आपल्याला माहित नाही मात्र मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे हे अजूनही चांगले दोस्त आहेत. त्यातही शरद पवार यांच्या पॅनलमध्ये नार्वेकर होते आणि शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी आकस असण्याचे कारण नाही असेही पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपाची हिंदुत्वाची भाषा कुठे गेली? शरद पवार यांच्या हिंदुत्वाबद्दल त्यांच्या एकूणच भूमिकेबद्दल सातत्याने भाजपाचे नेते टीका करीत असतात एकही संधी त्यांच्याबद्दल बोलण्याची सोडत नाहीत तेच नेते आशिष शेलार असतील देवेंद्र फडणवीस असतील आता एमसीएच्या निवडणुकीत शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात तेव्हा शरद पवारांचे कपडे हिंदुत्वाचे असतात का? तेव्हा कसे पवार चालतात असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.