ETV Bharat / state

नोटाबंदीवर रघुराम राजन मुंबईत काय बोलणार? - demonetisation

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असताना नोटाबंदीबाबत नव-नवे खुलासे बाहेर येत आहेत. मंगळवारी (ता.१२) यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. यावेळी नोटबंदी आणि आर्थिक धोरणांवर ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई 1
author img

By

Published : Mar 12, 2019, 1:22 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असताना नोटाबंदीबाबत नव-नवे खुलासे बाहेर येत आहेत. मंगळवारी (ता.१२) यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. यावेळी नोटबंदी आणि आर्थिक धोरणांवर ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुदतवाढीची संधी असूनही मोदी सरकारने रघुराम राजन यांना संधी दिली नव्हती. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाला राजन यांनी कडाडून विरोध केला होता.
कालच नोटाबंदीवरुन नवे वृत्त पुढे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होण्याआधी आरबीआय बोर्डाची एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतील काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

नोटबंदीसाठी सरकारकडून जी कारणे सांगण्यात आली होती. त्यातील बहुतांश मुद्दे आरबीआयच्या बोर्डावर असलेल्या काही संचालकांना पटले नव्हते. त्यामुळे याविषयी डॉ. राजन काय बोलतात याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०६ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात येणार आहे.

६ तासांत ४८४० कर्णबधिरांना कर्णयंत्र लावून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" करण्यात आला आहे. या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी यांच्या हस्ते देण्यात येणार असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिकेचे संस्थापक बिल अॅस्टीन व त्यांच्या पत्नी टॅनी अॅस्टिन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार, भारत' देऊन गौरविण्यात येणार आहे.

नोटाबंदीवर रघुराम राजन  आता काय बोलणार?

मुंबई: लोकसभा निवडणुका जाहीर  होऊन  नोटबंदीबाबत नवनवे  खुलासे  बाहेर  येत असताना  मंगळवारी ( ता.१२)य शवंतराव चव्हाण यांची १०६ वी जयंती निमित्त
शरद पवार  यांच्या उपस्थितीत  रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार स्विकारताना नोटबंदी  आणि आर्थिक धोरणांवर काय बोलतात  याकडे  सर्वांचे  लक्ष लागले आहे.

मुदतवाढीची संधी असूनही मोदी सरकारने  रघुराम राजन यांना  संधी दिली नव्हती. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाला  राजन यांनी कडाडून विरोध केला होता.

कालच नोटाबंदीवरुन नवे  वृत्त पुढे  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर होण्याआधी आरबीआय बोर्डाची एक महत्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतील काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. नोटबंदीसाठी सरकारकडून जी कारणे सांगण्यात आली होती. त्यातील बहुतांश मुद्दे आरबीआयच्या बोर्डावर असलेल्या काही संचालकांना पटले नव्हते. त्यामुळे शरद पवारांच्या उपस्थितीत डॉ.राजन काय बोलतात  याकडे  आता लक्ष लागले  आहे.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०६ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात येणार आहे.
६ तासांत ४८४० कर्णबधिरांना कर्णयंत्र लावून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" करण्यात आला आहे. या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी यांच्या हस्ते देण्यात येणार असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिकेचे संस्थापक बिल अॅस्टीन व त्यांच्या पत्नी टॅनी अॅस्टिन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार, भारत' देवून गौरविण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.