ETV Bharat / state

अभिनेता इरफान खान अन् मुंबई डबेवाल्यांचे अनोखे नाते... - rip irrfan khan mumbai dabewala

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (बुधवारी) निधन झाले. कोलोन इन्फेक्शनमुळे इरफानला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५४व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

actor Irrfan Khan
अभिनेता इरफान खान अन् मुंबई डबेवाल्यांचे अनोखे नाते...
author img

By

Published : Apr 29, 2020, 7:01 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (बुधवारी) निधन झाले. कोलोन इन्फेक्शनमुळे इरफानला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५४व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. त्याच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 'मुंबई डबेवाला असोसिएशन'तर्फे देखील इरफानला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर प्रतिक्रिया देताना
मुंबईच्या डबेवाल्यांचे आणी इरफानचे वेगळेच नाते होते. ”लंच बाॅक्स“ चित्रपटात अनेक डबेवाल्यांनी त्याच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाला हिंदी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड म्हणून, मान मिळाला होता. या चित्रपटाच्या प्रिमीयर शो चा आनंद माझ्यासह अनेक डबेवाल्यांनी त्याच्या बाजुला बसून घेतला होता. अशा या अष्टपैलू अभिनेत्याला मुंबई डबेवाल्यांची भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी सांगितले. लाइफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, हिंदी मीडियम यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. पिकूचे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.