ETV Bharat / state

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीने घेतली लस

अरुण गवळीने आज (दि. 11मे) कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात गवळीने कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे.

लसी घेताना अरुण गवळी
लसी घेताना अरुण गवळी
author img

By

Published : May 11, 2021, 9:12 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीने आज (दि. 11 मे) कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात गवळीने कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर त्याने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

फेब्रुवारीत झाली होती कोरोनाची लागण

शिवसेना नेत्याच्या खुनासह अनेक गुन्हे गवळीच्या नावावर दाखल आहेत. तर तो नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, फेब्रुवारीत गवळीला कोरोनाची लागण झाली होती. कारागृहातच त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीचा पॅरोल मंजूर केला आहे. पत्नीच्या आजाराचे कारण देत त्याने न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा पॅरोलवर असलेल्या गवळीने आज दुपारी नायर रुग्णालयात कोविशिल्डचा पहिला डोस घेतला.

हेही वाचा - राज्य शासन म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स खरेदी करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.