मुंबई - अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराज भोसले यांचा भाजप प्रवेश जाहीर झाला आहे. उद्या शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. यावेळी गृहमंत्री अमित शाह, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित राहणार आहेत. आपल्या भाजप प्रवेशाची माहिती त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून दिली.
हेही वाचा - फिरोज शाह कोटला आता अरुण जेटली स्टेडीयम या नावाने, कोहलीचाही सन्मान
-
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
तसेच त्यांनी ट्विटरवर संदेश देताना मतदारांना पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्या संदेशात त्यांनी म्हटले, "आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.".
हेही वाचा -राष्ट्रवादीला रामराम..! अखेर भास्कर जाधवांनी दिला आमदारकीचा राजीनामा
ट्विटरवर त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आता उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. गुरूवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते पक्षांतर करणार नाहीत असे पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.