मुंबई - एटीएम क्लोन करून लाखो रुपयांची चोरी करीत असत असलेल्या दोन विदेशी नागरिकांना मुंबई उत्तर विभाग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दोन विदेशी नागरिक एटीएम क्लोनिंगच्या सहाय्याने एटीएमचा डाटा चोरी करत होते व त्या डाटाच्या माध्यमातून नागरिकांचे पैसे एटीमच्या माध्यमातून काढत होते. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
मुंबईत विदेशी नागरिकांकडून भारतीय नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीस मुंबई उत्तर विभाग सायबर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपीची नावे मियु आयोनिल रुचिनल 48 वर्ष, बुदाई रोमाना वय 36 वर्ष या विदेशी नागरिकांना अटक केली. ही दोघेही मुंबईतील विविध ठिकाणच्या एटीएम क्लोनिगच्या सहाय्याने एटीएमचा डाटा चोरी करून नागरिकांच्या बँकेतील पैसे एटीएमच्या माध्यमातून काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या आरोपी कडून आतापर्यंत 8 लाख रुपये जप्त करण्यात आले.
या संपूर्ण रॅकेट मध्ये विदेशी नागरिक क्लोनिगसाठी मायक्रो कॅमेरा आणि मॅग्नेटिक चिप व इतर साहित्याचा वापर करत असल्याचे आढळून आले. एटीएम क्लोनिग करण्यासाठी वापरण्यात आलेले एटीएम क्लोनिंग मशीन, कॅमेरा, चिप, मोबाईल, कार असे सर्व साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. आता नागरिकांनी एटीएममध्ये पैसे काढताना पुरेशी काळजी आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आपण देखील एटीएममध्ये प्रवेश केल्यावर अशा प्रकारचे साहित्य लावले आहे की नाही. हे पाहणे गरजेचे असल्याचे मत सायबर पोलिसांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - सोशल मीडियावर कोणीतरी तुमच्या नावाचे फेक अकाऊंट तर तयार केले नाही ना?