ETV Bharat / state

चालकाचे टँकरवरील नियत्रंण सुटल्याने अपघात, २ ठार १ जखमी

विक्रोळीत चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये २ जण ठार तर १ जण जखमी झाले आहे.

चालकाचे टँकरवरील नियत्रंण सुटल्याने अपघात
author img

By

Published : Jun 9, 2019, 2:16 AM IST

मुंबई - विक्रोळीत चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये २ जण ठार तर १ जण जखमी झाले आहे. सायमा साहेबराव पवार (15), लक्ष्मीबाई खंडू वाघमारे (50) अशी मृतांची नावे असून, कार्तिक खंडू वाघमारे हा ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

विक्रोळी पार्कसाईट येथील वीर सावरकर मार्गावर कैलास कॉम्प्लेक्सजवळ हा अपघात घडला. वीर सावरकर मार्गावर रोजनदारी करणारे एक कुटुंब पदपथावर अनेक वर्षापासून राहत आहे. या कुटुंबातील लोक त्या ठिकाणी बांधलेल्या झोपडीबाहेर झोपतात. शनिवारी देखील या कुटुंबातील ५ सदस्य या पदपथावर आणि पदपथाच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरजवळ झोपले होते. त्या ठिकाणी अनेक टँकर पार्किंसाठी लावले होते. त्यावेळी एका टँकरचालकाचे नियत्रंण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक बसली. समोरच्या टँकरला धडक बसल्याने त्या टँकरखाली येऊन लक्ष्मी वाघमारे आणि सायमा पवार यांचा मृत्यू झाला. तर कार्तिक खंडू वाघमारे हा ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, राजवाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

चालकाचे टँकरवरील नियत्रंण सुटल्याने अपघात

अपघात करणारा टँकरचालक तेथून लगेच पळून गेला. याप्रकरणी पार्कसईट पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून, चालकाचा शोध सुरू केला आहे. या मार्गावर अनेक अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. याची नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर हा अपघात झाला. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Intro:विक्रोळीत टँकर अपघातात 2 ठार 1 जखमी

विक्रोळी पार्कसाईट येथील वीर सावरकर मार्गावर कैलास कोंप्लेक्स जवळ एका टँकर ने केलेल्या विचित्र आपघातात 2 जणांचा मृत्यू तर एक मुलगा जखमी झाला आहे.सायमा साहेबराव पवार(15) , लक्ष्मी बाई खंडू वाघमारे (50) असे मयतांचे नाव असून कार्तिक खंडू वाघमारे हा तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहेBody:विक्रोळीत टँकर अपघातात 2 ठार 1 जखमी

विक्रोळी पार्कसाईट येथील वीर सावरकर मार्गावर कैलास कोंप्लेक्स जवळ एका टँकर ने केलेल्या विचित्र आपघातात 2 जणांचा मृत्यू तर एक मुलगा जखमी झाला आहे.सायमा साहेबराव पवार(15) , लक्ष्मी बाई खंडू वाघमारे (50) असे मयतांचे नाव असून कार्तिक खंडू वाघमारे हा तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे

.वीर सावरकर मार्गावर हे रोजनदारी करणारे कुटुंब पदपथावर अनेक वर्षे रहात आहे.नेहमी प्रमाणे ते याच ठिकाणी बांधलेल्या झोपडी बाहेर झोपतात.शनिवारी देखील या कुटुंबाचे पाच ही सदस्य या पदपथावर आणि पदपथच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकर जवळ झोपले होते.टँकर च्या या रांगेत टँकर पार्क करण्यासाठी एक टँकर चालक टँकर घेऊन आला.त्याला गाडीवर नियंत्रण राहिले नाही आणि त्याने भरधाव वेगात या उभ्या टॅंकराना धडक दिली.या वेळी या पैकी एका टँकर जवळ हे कुटुंब झोपले होते जे त्या टँकर खाली आले.यात लक्ष्मी आणि सायमा यांचा जागीच मृत्यू झाला तर कार्तिक गँभिर जखमी झाला आहे.त्यांना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.हा अपघात करणारा टँकर चालक मात्र टँकर तिथेच सोडून पळून गेला आहे.या प्रकरणी पार्कसईट पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू केला आहे.या मार्गावर अनेक अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात म्हणून नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर हा अपघात झाला असल्याने या ठिकाणी उपस्थित स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.