ETV Bharat / state

दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज तहकूब, सत्ताधाऱ्यांचा सभागृहात गोंधळ - bhai

सत्ताधारी सदस्यांनी घातलेल्या गदारोळामुळे दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज तहकूब झाले. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या माफीसाठी केलेल्या गदारोळामुळे दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज थांबवण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीसाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला.

दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज तहकूब
author img

By

Published : Jun 28, 2019, 4:48 PM IST

मुंबई - सत्ताधारी सदस्यांनी घातलेल्या गदारोळामुळे दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज तहकूब झाले. काँग्रेसचे भाई जगताप यांच्या माफीसाठी केलेल्या गदारोळामुळे दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज थांबवण्यात आले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीसाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला अर्ध्या तासासाठी २ वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सत्ताधारी पक्षाकडून घालण्यात येत असलेल्या गदारोळावर खंत व्यक्त केली. अशा प्रकारे सत्ताधारी सदस्यांचा गोंधळ हा सदनाला शोभणारी गोष्ट नसल्याचे म्हणाले. तसेच सोमवारी गटनेत्यांच्या बैठक बोलावून त्यावर तोडगा काढला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच सभापतींनी प्रश्नोत्तारे पुकारली. पहिलाच प्रश्न हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा होता. मात्र त्याच दरम्यान, शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी आपण उपस्थित केलेल्या जातपडताळणीच्या प्रश्नावर मला उत्तर कधी मिळणार असा सवाल केला. तर भाजपचे सदस्य गिरीश व्यास यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याचा विषय उपस्थित केला. जगताप यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही या सभागृहात कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या संदर्भातील पहिल्याच प्रश्नावरील चर्चाही सत्ताधाऱ्यांनी रोखून धरली. यामुळे सभापतींनी अर्धा तास सभागृहाचे कामकाज रोखून धरले. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारले. जगताप यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका व्यास यांनी घेतल्याने उपसभातींनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या जमिन घोटाळ्यावरील २८९ च्या प्रस्तावावर बोलण्याची परवानगी दिली. त्याच दरम्यान पुन्हा सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. यामुळे मुंडे यांनी आम्ही भ्रष्टाचार आणि घोटाळ्यावर माहिती समोर आणतोय म्हणून तुम्ही गोंधळ घालत आहात काय ? असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. आम्ही कालपासून धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारू म्हणून सरकारला भीती वाटत असल्यानेच तुम्ही गोंधळ घालत असल्याचे मुंडे म्हणाले. त्यादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले होते. त्यातच आपण काय बोललो ही माहीती देण्यासाठी भाई जगताप यांनी बोलण्यास सुरूवात करताच सेनेच्या अनिल परब यांनी त्यांना रोखून धरले. त्यामुळे सभापतींनी शासकीय विधेयके, आदी मंजूर करून घेत लक्षवेधी आणि इतर कामकाज पुढे ढकलत असल्याचे सांगत सत्ताधारी पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या गदारोळावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

२ दिवसांपासून सत्ताधारी पक्षांकडून अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण केला गेल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.

Intro:दुसऱ्यादिवशीही विधानपरिषदेचे कामकाज सत्ताधाऱ्यांनी रोखले
मुंबई, ता. २८ : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित जमिन घोटाळ्यावर २८९ अन्वये स्थगनचा प्रस्ताव यावर चर्चा रोखून धरण्यासाठी सत्ताधारी सदस्यांकडून काँग्रेसचे भाई जगताप यांच्या माफीसाठी केलेल्या गदारोळामुळे दुसऱ्या दिवशीही विधानपरिषदेचे कामकाज तहकूब झाले. सुरूवातीला अर्ध्या तासासाठी दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी परिषदेचे कामकाज तहकूब झाले.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सत्ताधारी पक्षाकडून घालण्यात येत असलेल्या गदारोळावर खंत व्यक्त केली. अशा प्रकारे सत्ताधारी सदस्यांचा गोंधळ हा सदनाला ही गोष्ट शोभणारी नसल्याचे सांगत यावर सोमवारी गटनेत्यांच्या बैठक बोलावून त्यावर तोडगा काढले जाईल असे स्पष्ट करत विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.
प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात होताच सभापतींनी प्रश्नोत्तारे पुकारली. पहिलाच प्रश्न हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा होता. मात्र त्याच दरम्यान, शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी आपण उपस्थित केलेल्या जातपडताळणीच्या प्रश्नावर मला उत्तर कधी मिळणार असा सवाल केला, तर भाजपाचे सदस्य गिरीश व्यास यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याचा विषय उपस्थित केला. जगताप यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही या सभागृहात कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या संदर्भातील पहिल्याच प्रश्नावरील चर्चाही सत्ताधाऱ्यांनी रोखून धरली. यामुळे सभापतींनी अर्धा तास सभागृहाचे कामकाज रोखून धरले. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज पुकारले, मात्र यावेळीही व्यास यांनी जगताप यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही कामजा चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने उपसभातींनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या जमिन घोटाळ्यावरील २८९ च्या प्रस्तावावर बोलण्याची परवानगी दिली. त्याच दरम्यान पुन्हा सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. यामुळे विरोधीपक्ष नेते मुंडे यांनी आम्ही भ्रष्टाचार आणि घोटाळयावर माहिती समोर आणतोय म्हणून तुम्ही गोंधळ घालत आहात काय असा सवाल सत्ताधाऱ्यांना केला. आम्ही कालपासून धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारू म्हणून जर सरकारला भीती वाटत असल्यानेच तुम्ही गोंधळ घालत असल्याचे मुंडे म्हणाले. त्यादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले होते. त्यातच आपण काय बोललो ही माहिती देण्यासाठी भाई जगताप यांनी बोलण्यास सुरूवात करताच सेनेच्या अनिल परब यांनी त्यांना रोखून धरले. त्यामुळे सभापतींनी शासकीय विधेयके, आदी मंजूर करून घेत लक्षवेधी आणि इतर कामकाज पुढे ढकलत असल्याचे सांगत सत्ताधारी पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या गदारोळावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांपासून सत्ताधारी पक्षांकडून अभूतपूर्व असा गोंधळ निर्माण केला गेल्याने याविषयी सोमवारी सकाळी ९.३० वाजता सर्व गटनेत्यांची बैठक बोलावून त्यावर हा विषय सोडवून पुढील कामकाज सुरळीत चालवू असे सांगत विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Body:दुसऱ्यादिवशीही विधानपरिषदेचे कामकाज सत्ताधाऱ्यांनी रोखले Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.