मुंबई - सध्या जगभरता कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यावेळी आपात्कालीन परिस्थिचा सामना करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री साहय्याता निधीला देण्याचे एकमताने ठरवले आहे. ही रक्कम दोन कोटीच्या घरात असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
राज्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला असून संचारबंदी लावण्यात आली आहे. या काळात ज्ञानदान करणाऱ्या संस्थाना प्रत्यक्षपणे सक्रीय होता येत नाही. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आले आहे. ही रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे.
हेही वाचा - 'या' महामारीनंतरचे आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे'