मुंबई : विरार पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक शोषनापासून संरक्षण अधिनियम (पोस्को)2000 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळ हे एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाणे बोरिवली पश्चिम येथील असल्याने हा गुन्हा एम.एचपी पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपी तक्रारदाराचे मावशीचे पती आणि मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे तिसऱ्या विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी मावशीकडे राहण्यास असताना तिच्यावर (2014 ते 2022)दरम्यान लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
मुलीच्या काकाने अन् मुलाने केला अत्याचार : या गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही 14 वर्षांची आहे. पीडित मुलीच्या 50 वर्षीय काकाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच, त्यांच्या 19 वर्षीय मुलाने देखील जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना जबाब सांगितले. पीडित मुलीच्या काकाने आणि काकाच्या मुलाने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याने फिर्यादीने त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे.
दुसरा आरोपी बालक : या गुन्ह्यातील दोन्ही आरोपिंना अटक करण्यात आली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बोरीवलीतील जनरल लॉकअपमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर, दुसरा आरोपी बालक असल्याने त्याच्या आईस समजपत्र देऊन गुन्ह्याच्या तपाससाठी पोलीस बोलावतील तेव्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
मुलगी आपल्या मावशीकडे राहण्यासाठी गेली होती : या गुन्ह्यातील आरोपी हे पीडित मुलीच्या मोठ्या मावशीचा नवरा आणि मुलगा आहे. ही पीडित मुलगी आपल्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी ही घटना घडलेली आहे. ते घटनास्थळ एम.एच.बी पोलीस ठाणे येथील गणपत पाटील नगर असल्याने विरार पोलीस ठाण्यातून पॉस्कोचा गुन्हा एम.एच.पी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार : पीडित मुलगी आपल्या मावशीकडे (२०१४ सप्टेंबर २०२२)पर्यंत राहण्यासाठी आली होती. त्यादरम्यान वेळोवेळी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना घडली आहे, अशी माहिती एम.एस.बी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिली आहे.
हेही वाचा : Adil Khan Durrani Rape Case : राखी सावंतचा पती आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल