ETV Bharat / state

Athang Trailer Launched : तेजस्विनी पंडित निर्मित 'अथांग' चा ट्रेलर राज ठाकरे यांच्याहस्ते झाला लाँच! - अथांग चा ट्रेलर राज ठाकरे यांच्याहस्ते झाला लाँच

तेजस्विनी पंडित निर्मित 'अथांग' चा ट्रेलर (trailer of Athang produced by Tejaswini Pandit) राज ठाकरे यांच्याहस्ते लाँच (launched by Raj Thackeray) करण्यात आला. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित (Released on OTT on November 25) होणार आहे. Athang Trailer Launched

Athang Trailer Launched
अथांग वेबसीरिजचा ट्रेलर लाँच
author img

By

Published : Nov 22, 2022, 5:51 PM IST

मुंबई : अनेक कलाकार अभिनयक्षेत्रात नाव कमावल्यावर पुढची पायरी चढताना दिसतात. अनेक जण दिग्दर्शनाकडे वळतात, तर काही निर्मितीकडे. चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित (trailer of Athang produced by Tejaswini Pandit) आता निर्मितीक्षेत्रात उतरली असून; तिची पहिली प्रस्तुती आहे ‘अथांग’. ही एक वेब सिरीज असून; त्यात थरार ठासून भरलेला आहे. 'त्या' वाड्यातील रहस्य आता उलगडणार आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'अथांग'चा दिमाखदार ट्रेलर लाँच (launched by Raj Thackeray) सोहळा संपन्न झाला. Athang Trailer Launched

Athang Trailer Launched
अथांग वेबसीरिजचा ट्रेलर लाँच

भयावह वाडा, वाड्याबाहेर तुळशी वृंदावन, झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या, आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत. वेब सिरीज च्या सेटवरील वातावरणनिर्मिती यावेळी करण्यात आली होती. हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला त्यातील सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. तसेच या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी निर्माती तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासोबत गप्पांची मैफलही रंगवली. यानिमित्ताने राज ठाकरे यांचे कलाप्रेमही उपस्थितींना जाणून घेता आले.

Athang Trailer Launched
अथांग वेबसीरिजचा ट्रेलर लाँच

या वेळी राज ठाकरे आपल्या कलाप्रेमाबद्दल म्हणाले की, 'मी राजकारणात अपघातानेच आलो. माझा खरा कल कला क्षेत्राकडेच होता. मुळात मी चित्रपटप्रेमी आहे. त्यामुळे मी वेबसीरिज फार कमीच बघतो. परंतु 'अथांग' मी नक्कीच बघणार. जुना काळ पडद्यावर दाखवणे, तसे आव्हानात्मक आहे. मात्र हे आव्हान तुम्ही स्वीकारून उत्तम कलाकृती सादर केली आहे.'

Athang Trailer Launched
अथांग वेबसीरिजचा ट्रेलर लाँच

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली, 'या वेबसीरिजच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. कलाकार ते निर्माती हा प्रवास खूपच रंजक होता. कलाकार म्हणून वावरताना फारशी जबाबदारी नसते. परंतु निर्माती म्हणून काम करताना कागदावर श्रीगणेशा लिहिण्यापासून ते अगदी आपले काम प्रदर्शित होईपर्यंत किंबहुना त्यानंतरही जबाबदारी असते. मी अक्षय बर्दापूरकर यांचा आभारी आहे की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. निर्माती होणे माझ्यासाठी स्वप्न होते आणि ते आज 'अथांग'च्या निमित्ताने पूर्ण होतेय.'

ट्रेलरमध्ये निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरच्या शेवटी एक लहान मुलगा, 'आई अळवत म्हणजे काय?' असा प्रश्न विचारतो. आता सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे 'अथांग' पाहिल्यावरच उलगडेल.

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर हे निर्माते आहेत. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित (Released on OTT on November 25) होणार आहे. Athang Trailer Launched

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.