ETV Bharat / state

Traffic Policeman: वाहतूक हवालदाराला कारच्या बोनटवर१ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, माथेफिरुला नागरिकांनी चोपले!

चालू सिग्नल तोडून जाणार्या एका माथेफिरू कारचालकाला वसई वाहतूक विभागाच्या हवालदाराने अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वाहतूक हवालदारालाच जोरदार धडक देत तब्बल १ ते दीड किलोमिटर फरफटत नेल्याचा प्रकार वसई पूर्व परिसरात घडला. याप्रकरणी जागरूक नागरिकांनी ट्रॅफिक हवालदाराची सुटका करत मोथफिरूला चांगलाच चोप दिला आहे.

traffic policeman
हवालदाराला १ किलोमीटर पर्यंत नेले फरफटत
author img

By

Published : Feb 14, 2023, 9:56 AM IST

हवालदाराला १ किलोमीटर पर्यंत नेले फरफटत

वसई: रविवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास वसई वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस हवालदार सोमनाथ कथरू चौधरी हे कर्तव्यावर होते. याचदरम्यान, माथेफिरू तरूण सावेद जाफर सिद्धीकी त्याची कार युपी ३२ डीजे ७७०७ सिग्नल तोडून भरधाव वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमनाथ चौधरी यांना सावेद यांने कारने जोरदार धडक दिली. सदरची घटना रविवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी माथेफिरूवर माणिकपूर पोलीस ठाण्यात भादंविक ३०७, ३०८, ३५३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरप्रकरणी माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सिग्नलपर्यंत फरफटत नेले: याचवेळी सोमनाथ चौधरी या वाहतूक हवालदाराने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्ये आलेल्या सोमनाथ चौधरी यांना सावेद यांने कारने जोरदार धडक दिली. ही धडक बसताक्षणी सोमनाथ चौधरी हे गाडीच्या बोनटवर आदळले. अशाप्रसंगी माथेफिरू तरूणाने गाडी थांबविणे गरजेचे असताना त्याने उलट कारच्या बोनटवर आदळून पडलेल्या सोमनाथ चौधरी या ट्रॅफिक कर्मचार्याला रेंजनाका येथील सिग्नलपर्यंत फरफटत नेले. दैव बलवत्तर म्हणून रेंजनाका येथे वाहतुककोंडी असल्याने तसेच जागरूक नागरिकांनी सदर प्रकार पाहताच माथेफिरू तरूणाच्या तावडीतून ट्रॅफिक पोलिसाची सुटका केली. तसेच माथेफिरूला थांबवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण: झाल्या प्रकाराने पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसईत काही वर्षापूर्वी महेंद्र केवट या माथेफिरू रिक्षाचालकाने एका वाहतूक कर्मचार्याला जीवंत जाळले होते. यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कोरोना काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकार्याच्या अंगावर दुचाकी घालत त्यांना जबर जखमी केले होते. त्यात काल घडलेली घटना वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. अधूनमधून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे, त्यांना मारहाण करणे, अशा घटना घडत असतात. अशाप्रसंगी वाहतूक पोलिसांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी कायदा आणखी कडक करण्याचे आवाहन सुज्ञ नागरिक करत आहेत.

कार तीन किलोमीटरपर्यंत खेचली : रविवारी रात्री अशीच एक घटना घडली आहे. मेरठच्या रिठाणी चौकातून एक कार चालक यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करताच अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. धडकेनंतर ट्रकने कार ओढत नेली. सुमारे तीन किलोमीटर कार खेचल्यानंतर ट्रकचालकाने अचानक एका डंपरलाही धडक दिली. यानंतर ट्रक थांबला. कारचे मालक अनिल कुमार यांनी सांगितले की, ट्रक चालक मागून अतिशय वेगाने येत होता. त्याने त्यांच्या कारला धडक देत कार तुडवली. कारमध्ये त्यांच्यासह एकूण चार जण होते. कारमधील लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मेरठमध्ये गेल्या अनेक दिवसांत अशा दुर्घटना घडल्या आहेत.

हेही वाचा: Mumbai Police मीराभाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन पोलिसांकडून तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.