ETV Bharat / state

Weather Update: राज्यात पावसाशी संबंधित घटनांत 76 जणांचा मृत्यू - Heavy rain

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस ( Heavy rain ) सुरू आहे. यात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमुळे ( due to rain related incidents in the state) एकूण 76 जणांचा मृत्यू झाला (total of 76 deaths have been reported ) आहे. तर तब्बल 839 घरांचे नुकसान झाले आहे, तसेच 4,916 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

Heavy rain
मुसळधार पाऊस
author img

By

Published : Jul 10, 2022, 5:00 PM IST

Updated : Jul 10, 2022, 5:16 PM IST

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमुळे ( due to rain related incidents in the state) एकूण 76 जणांचा मृत्यू झाला (total of 76 deaths have been reported ) आहे. तर तब्बल 839 घरांचे नुकसान झाले आहे, तसेच 4,916 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. राज्यात पावसाचे जरा उशीराने आगमण झाले आहे. सध्या सर्व दुर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळदार पावसाची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी पावसामुळे इमारत पडुन तसेच पुराच्या पाण्यात वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

शेकडो घरांचे नुकसान:राज्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून पावसाशी संबंधित वादळं ,झाडं कोलमडून पडणे , वीज अंगावर पडणे किंवा जमीन धसणे वा नदीच्या पुरात व्यक्ती वाहून जाणे अश्या घटनांमुळे एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ८३९ घरांचे नुकसान झाले आहे, तर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरु असल्याने ४,९१६ हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचे राज्य आपत्ती व्यस्थापन विभागाने कळवले आहे.

मुंबईला रेड अलर्ट: सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली. शुक्रवारी पालघर, ठाण्यासह मुंबईलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.

विदर्भात अति मुसळधार पावसाची शक्यता : 5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागांत अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी वांद्रे, दादर या इतर भागात मुसळधार पाऊस झाला. सलग तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. रात्रभर पाऊस पडला, तर मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.

मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार : मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे काल अनेक सखल भागात पाणी साचले होते. काल मध्यरात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. यामुळे पून्हा सखल भागात पाणी साचले. सकाळी पाऊसाने विश्रांती घेतली तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा होत आहे. याकारणाने मुंबईतील ट्रॅफिकवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दुपारच्या दरम्यान मुंबईच्या रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसत आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा : या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Bjapur Rain - बीजापूरमध्ये मुसळधार पाऊस! काही ठिकाणी ट्रक गेल्या वाहून

Last Updated : Jul 10, 2022, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.