ETV Bharat / state

'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस - अनेक ठिकाणी बंडखोरी

युती आणि आघाडीच्या नेत्यांची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. आज (७ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख आहे.

बंडखोर मागे हटनार का?
author img

By

Published : Oct 7, 2019, 11:08 AM IST

मुंबई - विधानसभेचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीतील जागावाटप पूर्ण झाले आहे. मात्र, युती आणि आघाडीच्या नेत्यांची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. आज (७ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख आहे. त्यामुळे कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, हे आज स्पष्ट होणार आहे.

वरवरची दिसणारी भाजप-सेना युती अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही ठिकाणी जिथे भाजपच्या जागा आहेत. तिथे शिवसेनेच्या काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्यात युती आणि आघाडीच्या नेत्यांना कितपत यश मिळते, हे आज समजणार आहे.

हेही वाचा - 'आरे'तील वृक्षतोड म्हणजे हिटलरशाहीच; शिवसेनेचा 'सामना'तून सत्ताधाऱ्यांना टोला

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : भाजप-सेना युती, दोन्ही काँग्रेसची आघाडी.. 'वंचित' की 'मनसे' कुणाचे पारडे जड

कोकणात राणे विरुद्ध सेना

काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपने कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सेनेने त्यांच्या विरोधात सतिश सावंत यांना उमेदवारी दिल्याने कोकणात युतीचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोकणात राणेविरुद्ध सेना असा संघर्ष येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपला देण्यात आला आहे. त्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल होता. मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपकडे असून येथे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक नाराज होऊन शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ हा भाजपकडे आहे. येथून भाजपने अ‌ॅड. लक्ष्मण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे येथील शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांच्याविरोधात सेना बंडखोर उमेदवार विशाल धनवडे मैदानात उतरलेत. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, सेनेने येथे बंडखोरी केली आहे.

पनवेल मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे प्रशांत ठाकूर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथेही बंडखोरी करत शिवसेनेचे बबन पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. रामटेक मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथील शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ही जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे याठिकाणी सेनेच्या विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

सांगली – भाजप उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची बंडखोरी.

वाई – भाजप उमेदवार मदन भोसलेंविरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांची बंडखोरी.

माण – भाजपचे उमेदवार जयकुमार गोरेंविरोधात सख्खे भाऊ शेखर गोरेंची शिवसेनेतून उमेदवारी

सावंतवाडी – शिवसेना उमेदवार गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात भाजपच्या राजन तेलींची बंडखोरी

गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांच्या विरोधात भाजपच्या विनय नातूंची बंडखोरी

काँग्रेस राष्ट्रवादीतही बंडखोरी

१) सोलापूर शहर मध्य – काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

२) अहमदनगर – शहर राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या किरण काळे यांची वंचितमधून उमेदवारी

३) सांगोला – महाआघाडीतील शेकापचे उमेदवार अनिकेत गणपतराव देशमुखांविरोधात राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंची बंडखोरी

४) पंढरपूर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे रिंगणात

५) हिंगणघाट – राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुधीर कोठारींचं बंड

६) शिरोळ – स्वाभिमानीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांची बंडखोरी

७) पंढरपूर – माजी आमदार सुधाकर परिचारकांना महायुतीत रयत क्रांती संघटनेची उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या समाधान आवताडे आणि शिवसेनेच्या शैला गोडसेंची बंडखोरी

Intro:Body:

बंडखोर मागे हटनार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई -  विधानसभेचे मैदान आता चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीतील जागावाटप पूर्ण झाले आहे. मात्र, युती आणि आघाडीच्या नेत्यांची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. आज (७ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख आहे. त्यामुळे कोणकोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे, हे आज स्पष्ट होणार आहे.

वरवरची दिसणारी भाजप सेना युती अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही ठिकाणी जिथे भाजपच्या जागा आहेत. तिथे शिवसेनेच्या काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्यात युती आणि आघाडीच्या नेत्यांना कितपत यश मिळते हे आज समजणार आहे.

कोकणात राणे विरुद्ध सेना

काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केा आहे. त्यांना भाजपने कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, सेनेने त्यांच्या विरोधात सतिश सावंत यांना उमेदवारी दिल्याने कोकणात युतीचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कोकणात राणेविरुद्ध सेना असा संघर्ष येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपला देण्यात आला आहे. त्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल होता. मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपकडे असून येथे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक नाराज होऊन शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहेय

बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ हा भाजपकडे आहे. येथून भाजपने अॅड. लक्ष्मण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे येथील शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांच्याविरोधात सेना बंडखोर उमेदवार विशाल धनवडे मैदानात उतरलेत. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, सेनेने येथे बंडखोरी केली आहे. 

पनवेल मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे प्रशांत ठाकूर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथेही बंडखोरी करत शिवसेनेचे बबन पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. रामटेक मतदारसंघ हा युतीत भाजपकडे आहे. येथे भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथील शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ही जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे याठिकाणी सेनेच्या विश्वास नांदेकर यांनी बंडखोरी करून भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकूलवार यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

सांगली – भाजप उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची बंडखोरी.

वाई – भाजप उमेदवार मदन भोसलेंविरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांची बंडखोरी.

माण – भाजपचे उमेदवार जयकुमार गोरेंविरोधात सख्खे भाऊ शेखर गोरेंची शिवसेनेतून उमेदवारी

सावंतवाडी – शिवसेना उमेदवार गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात भाजपच्या राजन तेलींची बंडखोरी

गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांच्या विरोधात भाजपच्या विनय नातूंची बंडखोरी

काँग्रेस राष्ट्रवादीतही बंडखोरी

१) सोलापूर शहर मध्य – काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

२) अहमदनगर – शहर राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या किरण काळे यांची वंचितमधून उमेदवारी

३) सांगोला – महाआघाडीतील शेकापचे उमेदवार अनिकेत गणपतराव देशमुखांविरोधात राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंची बंडखोरी

४) पंढरपूर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे रिंगणात

५) हिंगणघाट – राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुधीर कोठारींचं बंड

६) शिरोळ – स्वाभिमानीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांची बंडखोरी

७) पंढरपूर – माजी आमदार सुधाकर परिचारकांना महायुतीत रयत क्रांती संघटनेची उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या समाधान आवताडे आणि शिवसेनेच्या शैला गोडसेंची बंडखोरी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.