मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूची मुंबई हॉटस्पॉट झाली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नवीन 722 रुग्णांचे निदान झाले. तर 27 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजार 689 वर तर मृतांचा आकडा 489 वर पोहोचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत रोज 600 ते 700 च्या वर कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचे निदान होत आहे. आजही मुंबईत नव्याने कोरोनाच्या 722 रुग्णांचे निदान झाले आहे. मुंबईत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 21 जणांना दिर्घकालीन आजार होते. 27 मृतांपैकी 11 पुरुष तर 16 महिला रुग्ण होत्या. मृतांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 12 जणांचे वय 60 च्या वर होते तर 12 जणांचे वय 40 ते 60 च्या दरम्यान होते.
डिस्चार्जचा आकडाही वाढला -
मुंबईत एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. मुंबईत गेले काही दिवस 140 ते 150 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत होता. त्यात आज वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईमधून आज सर्वाधिक 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत एकूण 2 हजार 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.