मुंबई - सीएसएमटी स्थानकाबाहेर झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीच्या ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या तिघी मुंबईच्या जीटी रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करत होत्या.
अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तिघींची नावे आहेत. डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या या तिघी आज संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाल्या, त्या कधीही परत न येण्यासाठीच. सीएसएमटी स्थानकाबाहेर पूल कोसळला आणि त्यात या तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेने तिघी राहत असलेल्या परिसरावर शोककळा पसरली आहे.