मुंबई : 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे खेळाचे महत्व वाढवणे त्यासोबत खेळाचा प्रसार आणि प्रचारावर भर देणे. प्रत्येक चार वर्षानंतर ऑलम्पिक खेळाचे आयोजन केले जाते. जगभरातून हाजारो ॲथलेटिक्स यात सहभाग नोंदवत असतात.
का साजरा करतात ऑलम्पिक दिवस : 23 जून 1894 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापना झाली. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यास 23 जून 1948 सुरुवात साली झाली. समितीचे पहिले अध्यक्ष ग्रीक उद्योगपती डेमेट्रीओस विकेलस होते. संपूर्ण जगात 205 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या लॉझने येथे आहे.
सरकारने पाठबळ उभे करावे : या वर्षीच्या ऑलिम्पिकची थीम आहे की, जगातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शारीरिक हालचालींसाठी थोडा वेळ द्यावा. ज्यामुळे त्यांना निरोगी राहण्यास मदत होईल. यातून लोकांना प्रेरित करण्याचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत 29 ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 2032 मध्ये होणार आहे. पदके जिंकायची असतील तर पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. या स्पर्धा भारतात झाल्या तर त्याचा फायदा खेळाडूंना होईल. राज्य सरकारने क्रीडा आणि खेळाडूंसाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मैदाने राखीव ठेवावीत. शाळांमध्ये खेळ हा अनिवार्य विषय करण्यात यावा. गरीब खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करावी. खेलो इंडियाच्या माध्यमातून भारत सरकार खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, मात्र ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षक गंगाधर राणे यांनी व्यक्त केले.
ऑलिंपिक क्रीडा प्रकाराकडे लक्ष द्या : स्वातंत्र्यानंतर भारताला 1952 साली भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. ते पहिल्या पदाचे मानकरी होते.खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्राला, देशाला मिळून पहिले पदक मिळून दिले होते. मात्र, महाराष्ट्रातील ऑलिंपिक स्पर्धेतील आढावा जर, घेतला तर महाराष्ट्राचे पहिले आणि शेवटचे ऑलम्पिक पदक म्हणजे खाशाबा जाधव यांनी मिळवले होते. त्यानंतर 72 वर्ष लोटली मात्र एकही क्रीडापटू महाराष्ट्राला घडवता आला नाही .
महाराष्ट्राला एकही पदक नाही : २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकच्या पाहता भारताने सात पदके जिंकली. पण महाराष्ट्राला एकही पदके मिळाले नाही. अनेक क्रीडा स्पर्धांना महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रातील ऑलिम्पिक मैदानावर मोठी स्पर्धा झाली. मात्र, सरकारचे नियोजन कुठेतरी चुकत आहे. राज्य सरकारने ऑलिम्पिक खेळाकडे लक्ष द्यावे. ही बाब राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन क्रीडा तज्ज्ञ प्रशांत केनी यांनी केले आहे.
कुस्तीपटूंसाठी 20 हजार रुपये मानधन : ऑलिम्पिक स्पर्धेतून पदकांची कमाई वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून मिशन ऑलिम्पिक अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सरकारने ऑलिम्पिक खेळ किंवा जागतिक कुस्तीपटूंसाठी 20 हजार रुपये मानधनही जाहीर केले आहे. राज्यातील खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी शालेय शिक्षणापासून क्रीडा ऐच्छिक विषय करावा, अशी मागणी क्रिडाप्रेमी करीत आहेत.