ETV Bharat / state

'डेक्कन क्वीन'मधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी 'हाऊसफुल्ल'

author img

By

Published : Aug 15, 2021, 7:15 PM IST

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसनंतर आजपासून मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच लावले आहेत. पहिली फेरीला प्रवाशांनी विस्टाडोम कोचला भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्याच फेरीत विस्टाडोम कोच हाऊसफुल्ल झाली आहे.

डेक्कन क्वीन
डेक्कन क्वीन

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसनंतर आजपासून मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच लावले आहेत. पहिली फेरीला प्रवाशांनी विस्टाडोम कोचला भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्याच फेरीत विस्टाडोम कोच हाऊसफुल्ल झाली आहे.

प्रवाशांचा तुफान प्रतिसाद

गाडी क्रमांक 02123/02124 सीएसएमटी - पुणे - सीएसएमटी डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनला रविवार (दि. 15 ऑगस्ट) एक विस्टाडोम डबा जोडण्यात आलेला. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा व्हिस्टाडोम डबा आहे. या मार्गावर पहिल्यांदा गाडी क्रमांक 01007/01008 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये 26 जुलैपासून विस्टाडोम कोच जोडण्यात आला. या मार्गावरील प्रवाशांची विस्टाडोम कोचची मागणी वाढल्याने डेक्कन एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आलेला आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. डेक्कनक्वीन एक्सप्रेसमधील व्हिस्टाडोम कोचच्या पहिली फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हाऊसफुल्ल झाला. व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, "विशेषतः पावसाळ्यात घाटांची दृश्ये रुंद खिडक्यांसह अनुभवता येतात. 75 व्या स्वातंत्र्यदिनी व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे व प्रवाशांच्या वतीने रेल्वेचे त्याबद्दल आभार मानले.

180 डिग्रीमध्ये बळणारी आसने

डेक्कन एक्स्प्रेसला विस्टाडोम कोचला पारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असल्याने संपूर्ण परिसर पाहता येणार आहे. तसेच विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये 'वाइड विंडो पॅन' आणि काचेचे छप्पर (टॉप) पुशबॅक खुर्च्या आणि वळणारी आसने, एलसीडी यामुळे प्रवाशांना विस्टाडोम कोचमधून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद मिळणार आहे. सध्या मान्सून काळात पावसाचा, धबधब्यांचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. सर्व बाजूंनी काचेचे आवरण असल्याने रेल्वेच्या बाहेरील संपूर्ण परिसर पाहता येणार आहे.

असा आहे विस्टाडोम कोच

डेक्कन एक्स्प्रेसच्या विस्टाडोम कोचमध्ये 40 आसने असणार आहे. तसेच मोठ्या काचेच्या खिडक्या, काचेचे छत, 12 एलसीडी, फ्रिज, फ्रिजर, ओव्हन, ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या साहित्यासाठी जागा, बाहेरील दृश्य पाहण्यासाठी विशेष जागा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच छतावरील काचेतून येणारी उष्णता कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. सूर्यप्रकाशाचा फक्त 40 टक्के उष्णता कोचमध्ये येणार आणि प्रवाशांना उकडणार नाही, अशाप्रकारचे छत बनविले जात आहे. यासह कोचमधील एसीची कुलिंगच्या पद्धतीत बदल केले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - ईटीव्ही विशेष : मुंबईत 30 लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत वाहने; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.