ETV Bharat / state

Maharashtra Politics: देश, लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे; ठाकरे गटाच्या मुखपत्रातून आवाहन - लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे

पैसा व सत्तेचा माज ही सध्याच्या राज्यकर्त्यांची राजकीय शस्त्रे बनली आहेत. विरोध करणाऱ्यांची डोकी उडवायची हे त्यांचे तत्त्वज्ञान झाले आहे. ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी इजरायलच्या टीम जॉर्ज कंपनीला ठेका दिलाचा गौफ्यस्फोट झाला आहे. अशा वेळी विरोधकांनी आपला अहंकार बाजूला ठेवून देश तसेच लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला पाहिजे. विरोधी ऐक्याचा तिढा लवकरात लवकर सुटायला हवा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनामधून करण्यात आले आहे.

Maharashtra Politics
ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामना
author img

By

Published : Feb 22, 2023, 10:23 AM IST

मुंबई : देशातील लोकशाही वधस्तंभाकडे ढकलली जात आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसला केलेले आवाहन महत्त्वाचे आहे. काँग्रेसने विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा, हे ऐक्य नीट झाले, तर भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत 100 मध्येच ऑल आउट करू असा विश्वास नितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. देशभरातील राज्यांमध्ये भाजपा विरोधामध्ये संताप आहे. भंपक राष्ट्रवाद आणि धर्मांधतेचे जहर फैलावून निवडणुका जिंकणाऱ्यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षाने एकत्र येणे, हेच भाजपच्या भंपक देशभक्तीला उत्तर ठरेल. अन्यथा विरोधकांचे आक्रमण कुचकामी ठरल्याशिवाय राहणार नाही, असेही सामनामध्ये म्हटले आहे.

वेगळ्या चुली मांडून अर्थ नाही : विरोधकांच्या आघाड्या किती होत असल्या तरी काँग्रेसशिवाय विरोधी ऐक्य शक्य नाही, नितेश कुमार यांनी हे सत्य सांगितले आहे. भारतीय जनता पक्षाची लढणे, हे मोदींच्या अतिरेकी हुकूमशाही प्रवृत्तीची लढण्यासारखे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव हे भाजपाशी लढण्यासाठी स्वतंत्र चुली मांडून बसले आहेत. पण अशा चुलींना अर्थ नाही. काँग्रेसच्या द्वेष करून भाजपच्या विद्यमान हुकूमशाहीशी कसे लढणार हे कोडे आधी सोडवायला हवे. प्रत्येकाला भाजपाविरुद्ध लढायचे आहे, पण सध्याच्या भाजपशी स्वतंत्र चुली व संसार मांडून लढता येणार नाही. विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाल्याशिवाय शक्य नाही हे, वास्तव काँग्रेसने ओळखले आहे. विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसला ही तेवढी चिंता आहे. हुकूमशाही सरकारला हटविण्यासाठी सर्व काही विसरून पुढे जायला हवे, असेही सामनामध्ये म्हटले आहे.

भाजपला पाणी पाजणे सहज शक्य : 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते नंतर ठरवता येईल. पण आधी एका टेबलावर बसून चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हरकत नाही. राहुल गांधी यांचे नेतृत्व भारत जोडो यात्रेने भक्कम व प्रगल्भ केले आहे. त्यांनी संपूर्ण देश पायी पालथा घातला. त्यानंतरच्या संसद अधिवेशनात हिंडनबर्ग व मोदी आदानी दोस्ती प्रकरणात जोरदार हल्ला करून मोदींचे वस्त्रहरण केले आहे. त्यामुळे मोदी उत्तर देऊ शकले नाहीत. भाषणात त्यांचा घसा कोरडा पडत होता. त्यांना वारंवार पाणी प्यावे लागत होते. याचाच अर्थ असा आहे की, विरोधक एकत्र आले तर 2024 आली भाजपाला पाणी पाजणे सहज शक्य आहे, असे मुखपत्रात म्हटले आहे.

देशात मनमानी सुरू : देशामध्ये एक प्रकारची मनमानी सुरू आहे. फोडा झोडा आणि राज्य करा, त्यासाठी निवडणूक आयोगापासून न्यायालय तपास यंत्रणाचा मुक्त गैरवापर करा, असे धोरण अवलंबले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडली व फुटीर गटाला खरी शिवसेना ठरवून त्यांना धनुष्यबाण चिन्ह विकत दिले. पक्षांतर्गत झगड्यात एक तर चिन्ह गोठवले जाते किंवा मूळ पक्षाकडेच ठेवले जाते. इकडे फुटीरांनी ते विकत घेतले असे स्पष्ट दिसते. नितेश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस पुढारी भाजपाने होलसेलमध्ये विकत घेतले. गुजरातमध्ये हार्दिक पटेलसह अनेक तरुण पुढाऱ्यांना फोडण्यात आले आहे. आजची भाजप ही कालची काँग्रेस बनली आहे. त्या पक्षाचा मूळ विचार संस्कार आणि संस्कृती यामुळे बदलली गेली आहे. पैसा व सत्तेचा माज हीच सध्याच्या राज्यकर्त्यांची राजकीय शस्त्र बनली असून विरोध करणाऱ्यांची डोकी उडवायची हे त्यांचे तत्त्वज्ञान झाले आहे. यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे सामनामधून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Thackeray VS Shinde: धनुष्यबाणाबाबत ठाकरे गटाला मिळणार का दिलासा? याचिकेवर आज दुपारी सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.