मुंबई : व्हिसाशिवाय फिल्म इंडस्ट्रीत काम केल्याप्रकरणी 17 परदेशींपैकी 10 महिलांवर (Ten ladies foreigners) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी 10 महिलांसह 17 परदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल (Mumbai Police Arrested) केला आहे. ते पश्चिम उपनगरातील दहिसरमध्ये वर्क व्हिसाशिवाय (without work visa) बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये (took part in shooting of Bollywood film) भाग घेत असल्याचे आढळून आल्याने, एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. Ten Ladies Foreigners Arrested
बेकायदेशीरपणे काम उघडकीस : शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. 'तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात एक टीम पाठवली. जिथे असे आढळून आले की, अनेक परदेशी लोक एका चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी झाले आहेत. आम्ही त्या सर्वांची कागदपत्रे तपासली आणि त्यापैकी काही बेकायदेशीरपणे काम करत असल्याचे आढळले. त्यांच्याकडे योग्य व्हिसा अढळून आला नाही', असे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.
पोलीसांची माहिती : दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील पुढे म्हणाले की, ''चित्रपटाच्या चित्रिकरणात जे १७ परदेशी नागरिक सहभागी झाले होते, ते विविध देशांचे आहेत, ते व्हिसा नियमांचे उल्लंघन करताना आढळले. या परदेशी लोकांना गोव्यातून एका सप्लायरने आणले होते, तो आता पोलिसांच्या रडारवर आहे. एका आघाडीच्या बॉलीवूड प्रॉडक्शन हाऊसने त्यांना आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी नियुक्त केले होते. ज्यासाठी दहिसर येथे शूटिंग सुरू होते. परदेशी कायद्याच्या संबंधित कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि चौकशी सुरू असल्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली."
काँग्रेसच्या नाईकांनी केली तक्रार : मुंबई काँग्रेसच्या मनोरंजन उद्योग शाखेचे कार्यवाह नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. नाईक म्हणाले की, "दहिसर येथील एल पी शिंगटे फिल्म स्टुडिओमध्ये गोव्यातून अनेक परदेशी लोक एका चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे आम्हाला समजले. या लोकांकडे वर्क व्हिसा नाही, अशी माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही पोलिसांकडे संपर्क साधला." Ten Ladies Foreigners Arrested