नवी मुंबई - कर्करोगाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे. या रोगावरील उपचारासाठी आता 'प्रोटॉन' थेरपी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. खारघरमधील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये या पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे. कर्करोग पीडितांच्या शरीरावरील दुष्परिणाम या थेरपीमुळे टाळता येणार आहेत.
सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी या तीन पद्धतींनी कर्करोगावर उपचार केले जातात. रेडिएशन थेरपीचा उपयोग सर्जरीनंतर केला जातो. शरीरातील कर्करोग बाधित नसलेल्या पेशींवर या थेरेपीमुळे दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी सध्या प्रोटॉन थेरेपी वरदान ठरत आहे. कर्करोगाच्या गाठींव्यतिरिक्त इतर कोणत्याही भागाचे नुकसान न करता हे तंत्रज्ञान कर्करोगाच्या पेशींना नष्ट करते.
हेही वाचा - 'गुगल पे'मधील 'त्या' त्रुटीने वापरकर्ते संभ्रमात; आर्थिक व्यवहारात येतोय अडथळा
किमोथेरपीमध्ये कर्करोग पीडित रुग्णांचे केस गळतात. त्यांना असह्य वेदनांचाही सामना करावा लागतो. याशिवाय रेडिओथेरपीमध्ये त्वचा जळण्याचेही प्रकार घडत असतात. हे सर्व आता प्रोटॉन थेरपीमुळे टाळता येणार आहेत.
हेही वाचा - '...म्हणून मला कोणी 'डिग्री' विचारत नाही'
ही थेरपी लहान मुलांसाठी जास्त उपयुक्त आहे. यावर खारघरच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाणार आहे. डिसेंबर २०२० पर्यंत प्रोटॉन थेरपीच्या माध्यमातून पहिल्या रुग्णावर उपचार केले जातील, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर वर्षाला १००० ते १२०० कर्करोग पीडित लहान मुलांना या पध्दतीने उपचार दिले जाणार आहेत. ही उपचार पद्धती मोफत आणि अत्यंत शुल्लक दराने केली जाईल, अशी ग्वाही डॉ. टाटा कॅन्सर रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांनी दिली.
हेही वाचा - सूरज पांचोली बनणार 'बॉक्सर', पहिली झलक प्रदर्शित