ETV Bharat / state

Swachh Bharat Mission : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीत परिवर्तित केलं - देवेंद्र फडणवीस - नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ

Swachh Bharat Mission : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोंदीचे कौतुक करत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 2:04 PM IST

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई Swachh Bharat Mission : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारनं शहरं तसेच ग्रामीण भागामध्ये 'एक तारीख, एक तास' हा उपक्रम आयोजित केला असून राज्यातही मुंबईसह अनेक ठिकाणी स्वच्छ अभियान या उपक्रम राबविण्यात येतोय. मुंबईतील शिवडी किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही स्वच्छता अभियान राबवलं. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्वच्छता अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांची चळवळ केल्यानं याला मोठा प्रतिसाद भेटत असल्याचं सांगितलंय.

घनकचऱ्याचं व्यवस्थापन : यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आता मल जलाचे शुद्धीकरण काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलेलं आहे. महाराष्ट्रात २२१ छोट्या मोठ्या शहरांमध्ये सिवरेज ट्रीटमेंटचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याचं व्यवस्थापन आपण करत आहोत. नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ या दृष्टीनं त्यावर प्रक्रिया करून त्यापासून विद्युत निर्मिती करायची, विविध उपक्रम करायचे अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीमध्ये परावर्तित केलं त्यामुळंच हे सर्व शक्य झाल्याचं फडणवीस म्हणाले. एखादी गोष्ट जेव्हा लोकांची चळवळ होते तेव्हा त्याला कोणीच थांबवू शकत नाही. अशीच लोक चळवळ किल्ल्यांकरता स्वच्छतेची लोकचळवळ आजपासून सुरू होत आहे. यापुढं आपल्या किल्ल्यांवर स्वच्छता दिसेल, कुठेही कचरा दिसणार नाही, असा विश्वास याप्रसंगी फडणवीसांनी व्यक्त केलाय.

स्वच्छता मोहिमेत अनेक मोठ्या नेत्यांचा सहभाग : केंद्र सरकारनं 'एक तारीख, एक तास' हा उपक्रम जाहिर केल्यानंतर विविध केंद्रीय मंत्र्यांनी देशाच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. लोकांनी आपापल्या भागातील रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमधील अहमदाबादमध्ये साफसफाई करताना दिसले. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सहभाग घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखीही नवी दिल्लीतील स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना दिसल्या. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी पाटणा येथे 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत आयोजित स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

हेही वाचा :

  1. Ganesh Idol Immersion : बाप्पाच्या विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढिग, 'या' दिग्गजांनी घेतला स्वच्छता अभियानात सहभाग
  2. Men Intimate Hygiene Tips : वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यासाठी फॉलो करा या पर्सनल हायजीन टिप्स
  3. Waste Disposal Stick : कचऱ्याची विल्हेवाट लावायची? 'ही' घ्या हातात काठी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.